शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

पाच कृषी केंद्रांना विक्री बंदीचे आदेश

By admin | Updated: September 21, 2014 23:45 IST

जादा दराने रासायनिक खताची विक्री केल्या जात असल्याचा तक्रारी प्राप्त होताच भरारी पथकाने केलेल्या कारवाहीत पाच कृषी केंद्रावर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले. युरिया खताची कृत्रिम टंचाई

लाखांदूर : जादा दराने रासायनिक खताची विक्री केल्या जात असल्याचा तक्रारी प्राप्त होताच भरारी पथकाने केलेल्या कारवाहीत पाच कृषी केंद्रावर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले. युरिया खताची कृत्रिम टंचाई भासवून शेतकऱ्यांची लूट केली जात होती. या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.तालूक्यात ११०० रासायनिक खत, ७६ औषधे विक्री, तर बियाणे विक्रीचे एकुण ६५ परवानाधारक कृषी केंद्र आहेत. यंदा हंगाम सुरु झाला असल्यानंतरही पावसाला जोरदार सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत फवारणी केली नाही. मात्र त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी खत फवारणीला एकदम सुरुवात केल्याने अचानक मागणी वाढली. ४५० मे. टन युरिया खताचा साठा तालुक्यात असतांना मागणी वाढली व खताची टंचाई निर्माण झाली. नेमका याचाच फायदा घेत. कृषी केंद्र संचालकांनी युरिया खताची विक्री जादा दराने करणे सुरु केली. कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखांदूर व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. भरारी पथकाने तक्रारीची तत्काळ दखल घेत. तात्काळ कृषी केंद्रांना भेटी देऊन तपासणी सुरु केल्या. यात ६५ कृषी केंद्राच्ांी चौकशी करण्यात आली. रेकॉर्ड अद्ययावत नाही, वेळोवेळी विक्री व साठा अहवाल कार्यालयास सादर नाही, स्टॉक बरोबर नाही. असा ठपका ठेवत पाच कृषी केंद्रावर कार्यवाही करुन त्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले.पुरुषोत्तम कृषी सेवा केंद्र, गवराळा, प्रथम कृषी केंद्र कुडेगाव, साई कृषी केंद्र विरली/बु., गणेश कृषी केंद्र लाखांदुर/किन्हाळा, वैभव कृषी केंद्र, करांडला यांचेवर कार्यवाही करीत विक्री बंदचे आदेश देण्यात आले. यामुळे कृषी केंद्र संचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.यूरीया खताची तीव्र टंचाई असल्या कारणाने कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांची जादा दराने खत विक्री करुन लूट सुरु केली आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत. युरियाचा साठा असलेल्या कृषी केंद्रामध्ये कृषी सहायकांच्या उपस्थितीत यूरीया खताची विक्री करण्यात आली. याकरिता आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार ही कार्यवाही केल्या जाते. भरारी पथकामध्ये कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखांदूर संजय लांजेवार, तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी कार्यवाही केली. (तालुका प्रतिनिधी)