मोहाडी तालुक्यात एक्स्पायरी झालेल्या दारुची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:01:10+5:30

शासनाने मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर तालुक्यांतर्गत दारु (बिअर) विक्रीची दुकाने सुरु झाली. मद्यपी शौकिनांनी दुकानात गर्दी केली. यातच एका दुकानातून ८ ऑगस्ट २०१८ मध्ये निर्मित एका नामांकित कंपनीची बिअरची बॉटल विकण्यात आली. उत्पादन झालेल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वापर व्हायला हवा.

Sale of expired liquor in Mohadi taluka | मोहाडी तालुक्यात एक्स्पायरी झालेल्या दारुची विक्री

मोहाडी तालुक्यात एक्स्पायरी झालेल्या दारुची विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी तालुक्यातील एका मद्यविक्री दुकानातून एक्स्पायरी झालेल्या दारुची विक्री केली जात असल्याचा प्रकार रविवारी उघडकीला आला. मद्यप्राशन करणाऱ्या इसमांच्या जीवाशी हा खेळ असून याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला तक्रार करुनही कारवाई करण्यात आलेली नाही.
शासनाने मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर तालुक्यांतर्गत दारु (बिअर) विक्रीची दुकाने सुरु झाली. मद्यपी शौकिनांनी दुकानात गर्दी केली. यातच एका दुकानातून ८ ऑगस्ट २०१८ मध्ये निर्मित एका नामांकित कंपनीची बिअरची बॉटल विकण्यात आली. उत्पादन झालेल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वापर व्हायला हवा.
मात्र एक्स्पायरी झाल्यानंतरही सदर दारुच्या बाटल्याची विक्री होत आहे. याबाबत काही लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याला सूचना देत कारवाईची मागणी केली. यावर नाव न सांगण्याच्या अटीवर त्या कर्मचाºयाने सदर दुकानदाराला एक्सपायरी झालेली दारु विकण्यास मनाई करण्याचे तोंडी सांगितले. मात्र आतापर्यंत कितीतरी बाटल्याची विक्री झाल्याने आऊटडेटेड दारु पिणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Sale of expired liquor in Mohadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.