शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती भागातील सागवन जंगल भुईसपाट

By admin | Updated: November 10, 2014 22:37 IST

लाखांदूर-अर्जुनी (मोरगाव) सीमेवरील घनदाट जंगलातून सागवान लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. पिंपळगाव (कोहळी) व धाबेटेकडी या भागातील सागवन जंगल भुईसपाट झाल्याचे उघडकीस आले आहे.

अधिकारी-तस्करांचे साटेलोटे : लाखांदूरमार्गे नागपुरात सागवान तस्करीलाखांदूर : लाखांदूर-अर्जुनी (मोरगाव) सीमेवरील घनदाट जंगलातून सागवान लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. पिंपळगाव (कोहळी) व धाबेटेकडी या भागातील सागवन जंगल भुईसपाट झाल्याचे उघडकीस आले आहे. वनअधिकारी आणि सागवन तस्करांमुळे हे जंगल आता ओसाड पडू लागले आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर गोंदिया वनविभागाची पुनर्रचना करताना झालेल्या चुकीमुळे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सुमारे २,७३७.३० हेक्टर वनक्षेत्र अजूनही गोंदिया वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात आहे. दोन्ही जिल्ह्याच्या सिमारेषेत असलेले पिंपळगाव को व धाबेटेकडी येथील वनक्षेत्रात सागवन जंगल मोठ्या प्रमाणात आहे. १ मे १९९९ ला जिल्हा विभाजनानंतर वनक्षेत्राचेही विभाजन होवून सागवन वनक्षेत्र गोंदिया जिल्ह्यात गेले. याचाच फायदा घेत तेथील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वनतस्करांनी संगनमत करुन वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू केली. वनपरिक्षेत्र कार्यालयापासून जंगल दूर अंतरावर आहे. जंगलाला लागून असलेले गोंदिया जिल्ह्यातील कोरंभी, धाबेटेकडी, बोडध, बोरी, झरपडा, ताडगाव तर लाखांदूर तालुक्यातील पुयार, पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव, चिचगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सागवन झाडांचे खसरे तयार करून धाबेटेकडी येथील वनविभागाचे अधिकारी झाडे कापण्याची परवानगी देतात. याच खसऱ्यांमध्ये जंगलातील सुकलेले सागवानची लाकडे एकत्र करून शिताफीने विकले जातात. यासाठी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. नागपूर येथील बाजारात धाबेटेकडी जंगलातील सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच लोकमतने ‘स्टिंग आपरेशन’ करुन पिंपळगाव (को) व धाबेटेकडी सीमेलगतचे सागवन जंगल पिंजून काढले असता धक्कादायक बाब उघडकीस आली. अर्जुनी (मोरगाव) रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगलात आत ४ ते ५ कि़मी. फिरून पाहाणी केली असता. शंभराहून अधिक सागवान झाडांना तोडून लाकडे जमा करुन ठेवल्याचे दिसून आले. शेकडो झाडे अर्धवट कापलेल्या स्थितीत आढळून आले तर मोजण्या पलिकडे झाडांची कत्तल करुन ठेवली आहे. मागील सहा वर्षाच्या काळात हजारांहून अधिक सागवान झाडांची कत्तल करून तस्करी करण्यात आल्याचे दिसून आले. वनतस्कर व वन अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण मैत्रीमुळे हा प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. या जंगलातील तोडलेली लाकडे लाखांदूरमार्गे नागपूरला विकण्यात येत असल्याचे एका वनकर्मचाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर बोलताना सांािगतले. (तालुका प्रतिनिधी)