शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टी तुमसरची, गिट्टी मात्र साकोली तालुक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

तालुक्यात गौण खनिजांचे अवैधपणे उत्खनन होत असल्याचे प्रकरण घडत आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाने वडद पहाडीजवळील सावरबंध येथे गिट्टीचे चार ट्रक अडवून त्याची तपासणी केली. यात रॉयल्टीची तपासणी केली असता ट्रक चालकांजवळ रॉयल्टी ही तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील असल्याचे आढळले.

ठळक मुद्देचार ट्रक पकडले : पहाडीच्या कंत्राटदाराची होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात रेती तस्करीच्या घटना घडत असताना महसूल विभागही खळबळून जागा झाला आहे. महसूल विभागाने शुक्रवारी कारवाई करत गिट्टीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रक पकडले. विशेष म्हणजे रॉयल्टी ही तुमसर तालुक्याची असून गिट्टीचा भरणा मात्र साकोली तालुक्यातील आहे.तालुक्यात गौण खनिजांचे अवैधपणे उत्खनन होत असल्याचे प्रकरण घडत आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाने वडद पहाडीजवळील सावरबंध येथे गिट्टीचे चार ट्रक अडवून त्याची तपासणी केली. यात रॉयल्टीची तपासणी केली असता ट्रक चालकांजवळ रॉयल्टी ही तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील असल्याचे आढळले. तपासणीच्यावेळी सदर ट्रकमध्ये भरलेली गिट्टी ही साकोली तालुक्यातील वडद पहाडीतील असल्याचे समोर आले.नियमाप्रमाणे ज्या ठिकाणाहून गिट्टी भरली जाते त्याच ठिकाणची रॉयल्टी घेणे आवश्यक असते. मात्र या चारही ट्रकमधील रॉयल्टी तुमसर तालुक्यातील असल्यामुळे सदर ट्रक तहसील कार्यालय साकोली येथे जमा करण्यात आले. एक ट्रक नादुरूस्त असल्याने घटनास्थळीच आहे.चारही ट्रक हे शिवालय कंस्ट्रक्शन कंपनी लाखनी यांच्या मालकीचे असून यात ट्रक क्रमांक एमएच ३६ एए ३३५८, एमएच ३५ एजे १६८५, एमएच ४० बीएल ७४८५ व एमएच ४० एम ४६०५ असा आहे. ही कारवाई तहसीलदार तेढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक लोकेश कोटेवार, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी सिडाम, हटवार, बिसेन यांनी केली.कारवाईकडे सर्वांचे लक्षनियमाप्रमाणे ज्या परवानगीधारक ठेकेदाराला पहाडीतील गिट्टीचे खनन करून विक्री करण्याचे अधिकार आहेत. त्यांनाच ट्रक किंवा ट्रॅक्टरमध्ये गिट्टी भरल्यानंतर रॉयल्टी देण्यात येते. विनारायल्टीने गिट्टी दिल्यास कंत्राट रद्द करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहे. परिणामी या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार