शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती काळात बचाव पथकाची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मंडल यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे प्रशिक्षण व मॉक ड्रिल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात १० ते १५ जून या कालावधीत मान्सूनचे आगमन होणार आहे. अशावेळी मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण व मॉकड्रिल आवश्यक आहे. मात्र या आपत्ती काळात शोध व बचाव पथकासह स्वयंसेवकांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी केले.शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मंडल यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील शोध व बचाव पथकाला नैसर्गीक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती या विषयावर उद्भवलेल्या समस्येचे निवारण करण्याकरिता स्थानिक संस्था व प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमाने आपत्ती व्यवस्थापनाकरिता लागणाऱ्या साहित्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्पदंशापासून बचाव, प्राथमिक उपचार, वीज व आगीपासून बचाव, नाव व धरणामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण, अचानक नाव उलटून झालेल्या अपघाताप्रसंगी प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भूकंप, पूर व अन्य नैसर्गिक आपत्तीवरही व्याख्यान, प्रात्याक्षिक व मल्टीमिडीयाद्वारे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. याप्रसंगी जिल्हास्तरावर उपलब्ध असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्याची पाहणी करण्यात आली.जिल्हा यंत्रणा सज्जजिल्ह्यात नदीकाठावरील गावांना पुराचा धोका असतो. जवळपास १४० पेक्षा जास्त गाव पुराच्या वेढ्यात सापडतात. अशावेळी शोध व बचाव पथकातर्फे त्यांची मदत केली जाते. यावेळीही पुरपरिस्थितीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी