दुभाजकामुळे रस्ता झाला अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:28+5:30

बस स्टॉप चौक मोहाडी येथे रस्ता दुभाजकाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भविष्याच्या विचार न करता तसेच मोठे जड वाहने अरुंद झालेल्या रस्त्यावरून कसे वळण घेतील याचा परिपूर्ण अभ्यास न करता दुभाजक बांधण्याचे कार्य सुरू करण्यात आले.

road divider narrowed the road | दुभाजकामुळे रस्ता झाला अरुंद

दुभाजकामुळे रस्ता झाला अरुंद

Next
ठळक मुद्देमोहाडी शहरातील प्रकार : अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : येथील राज्य महामार्गावरील मोहाडी बस स्टॉप चौकात दुभाजकाचे काम मागील एक महिन्यापासून संथ गतीने सुरू असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या दुभाजकामुळे चौकातील रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
बस स्टॉप चौक मोहाडी येथे रस्ता दुभाजकाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भविष्याच्या विचार न करता तसेच मोठे जड वाहने अरुंद झालेल्या रस्त्यावरून कसे वळण घेतील याचा परिपूर्ण अभ्यास न करता दुभाजक बांधण्याचे कार्य सुरू करण्यात आले.
एवढेच नाही तर अंदाज पत्रकाप्रमाणे काम सुद्धा करण्यात येत नसल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती ही माती मिश्रित असल्याची तसेच बांधकाम पक्के होण्यासाठी सिमेंटच्या बांधकामावर पाणी मारण्यात येत नसल्याची तक्रार आहे.
रस्ता दुभाजकाचे कार्य सुरू असतानाच अरुंद झालेल्या रस्त्यामुळे एका चार चाकी वाहनाने या दुभाजकाला धडक दिली त्यामुळे एका बाजूचे दुभाजकही थोडेसे तुटलेले आहे.
जर दुभाजक तयार करायचे होते तर त्यासाठी रस्ता रुंद करणे गरजेचे होते. असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे होत असलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व होत असलेल्या कामात आत्ताच सुधारणा करावी, जेणेकरून भविष्यात अपघात होणार नाही, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: road divider narrowed the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.