शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नदीघाट लिलाव आष्टीचा रेती उत्खनन दुसऱ्याच स्थळातून

By admin | Updated: October 11, 2014 01:17 IST

तुमसर तालुक्यातील पाथरी गावाबाहेर रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नदीपात्रातून रेती उपस्याची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत होती.

तुमसर : तुमसर तालुक्यातील पाथरी गावाबाहेर रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नदीपात्रातून रेती उपस्याची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत होती. तत्पूर्वी रेती कंत्राटदारांनी डम्पिंग यार्ड तयार केले. आष्टी नदीघाटाचा लिलाव झाला होता. परंतु ग्रामस्थांनी विरोध केल्याने कंत्राटदारांनी मोर्चा पाथरीकडे वळविला आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर आष्टी हे गाव आहे. गावाशेजारून बावनथडी नदी आहे. महसूल प्रशासनाने आष्टी नदीघाटाचा लिलाव केला होता. सुरुवातीला रेतीचे ट्रक गावातून सर्रास जात होते, पुढे गावकऱ्यांनी या ट्रकना रेती नेण्यासाठी मनाई केली. कंत्राटदाराने त्यानंतर दुसरीकडून रेतीचा उपसा करणे सुरु केले. पाथरी या गावाकडे आपला मोर्चा वळविला. नदी घाटातून रेती उत्खनन करण्याची परवानगी ३० सप्टेंबरपर्यंत होती. मुदत संपण्याची वेळ जवळ आली तसे कंत्राटदाराने पाथरी गावाबाहेर तलाठी कार्यालयाच्या मागे रेतीचे डम्पिंग यार्डच तयार केले. २४ तास येथे रेतीचा उपस्या सुरु होती अशी माहिती आहे. यासंदर्भात तलाठी देशभ्रतार यांना विचारले असता मी निवडणूक कामात व्यस्त आहे, असे सांगून तहसीलदारांकडून अधिक माहिती घ्या, असे बोलले.यासंदर्भात ग्रामवासीयांशी संवाद साधला असता अनेकदा याची तक्रार केल्यावर प्रशासनाने कारवाई केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आष्टी येथे नदीघाट नियमानुसार लिलाव झाले असताना दुसरीकडून रेती उत्खनन कसे केले. लिलावापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागते. आष्टी ग्रामपंचायतीने रितसर परवानगी दिली. मग त्यांना मज्जाव कसे करण्यात आले. रेती नदीपात्रातून दुसरीकडून कशी काढण्यात आली. सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)