शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

किन्ही-गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

किन्ही गडेगाव येथील तलावाची अवस्था दयनीय झाली होती. त्यात जलसंचय होण्यास अडचण होत होती. सदर तलाव सुमारे ५३ हेक्टर परिसरात आहे. हा प्रकार हिंदूजा फाउंडेशनच्या निदर्शनास आला. त्यांनी या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी निधीतून तीन महिन्यापूर्वी तलावाच्या पुनरूज्जीवन कामाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देवन्यजीवांसह चार हजार लोकसंख्येला होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील बहुतांश तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा तलावांचे सामाजिक बांधिलकीतून पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदूजा फाउंडेशनच्या पुढाकारातून भंडारा तालुक्यातील किन्ही गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन करण्यात आले. या तलावात पाण्याचा मोठा साठा झाला असून याचा फायदा वन्यजीवांसह परिसरातील चार हजार लोकसंख्येला होणार आहे.किन्ही गडेगाव येथील तलावाची अवस्था दयनीय झाली होती. त्यात जलसंचय होण्यास अडचण होत होती. सदर तलाव सुमारे ५३ हेक्टर परिसरात आहे. हा प्रकार हिंदूजा फाउंडेशनच्या निदर्शनास आला. त्यांनी या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी निधीतून तीन महिन्यापूर्वी तलावाच्या पुनरूज्जीवन कामाला सुरुवात करण्यात आली. ५३ हेक्टर परिसरातील तलावावर ६० लाख रुपये खर्च करून तलाव पुनरूज्जीवीत करण्यात आला.यासोबतच या तलावाच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. सद्यस्थितीत या तलावाच्या संचय क्षमतेत ६५ टक्के वाढ होणार आहे. पावसाळ्यात याचा अनुभवही परिसरातील नागरिकांना आला आहे.पूर्वी उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूमध्ये हा तलाव आटून जायचा. पाण्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण व्हायचा. आता या तलावाच्या पुनरूज्जीवनामुळे स्थानिक पातळीवर सकारात्मक बदल होतील. होसूर येथे ६० हेक्टरपर्यंत जलक्षमता तसेच ४.५ हेक्टर तलावाच्या पुनरूज्जीवनामुळे आसपासच्या परिसराला स्वच्छ पाणीपुरवठा मिळेल. सिंचन क्षमता वाढेल आणि मासेमारीसाठीही हा तलाव उपयुक्त ठरणार आहे.पुनरूज्जीवन तलाव ताब्यात देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भंडाराचे तहसीलदार अक्षय पोयाम, सरव्यवस्थापक एम.एम. लखोटे, मनुष्यबळ उपाध्यक्ष टी.शशीकुमार तसेच हिंदूजा फाउंडेशनचे संचालक नियती सरीन उपस्थित होते. जलजीवन कार्यक्रमांतर्गत सीएसआर प्रकल्पान्वये या प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करण्यात आले.तलावामुळे वाढीव पाणीपुरवठा होईलसरव्यवस्थापक एम.एम. लखोटे यांनी या कामाची माहिती दिली. तलावाचे पुनरूज्जीवन करताना पर्यावरणासोबतच समाजातील घटकांसाठी पाण्याचे महत्व लक्षात घेता हा प्रकल्प साकारण्यात आला. या तलावाच्या निवडीमध्ये एनव्हायरमेंटालिस्ट फाउंडेशन आॅफ इंडियाने महत्वाची भूमिका वठविली. किन्ही व गडेगाव या दोन्ही ग्रामपंचायतला या तलावामुळे वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. सोबतच कोका अभयारण्यातील वन्य प्राण्यांनाही उन्हाळात पाण्यासाठी हा तलाव मोठा आधार ठरणार आहे. ही योजना दीर्घकाळ जलक्षमता कायम ठेवत उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना पुरेसा ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. किन्ही गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन झाले असून पावसामुळे हा तलाव तुडूंब भरला आहे. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला हा परिसर पर्यटकांना आकर्षीत करीत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी