शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करांविरोधात महसूल प्रशासन एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

तुमसर तालुक्यातील चिचोली फाट्यावर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्या भरारी पथकाने टिप्पर क्रमांक एम एच ३६ एए ०५४८, एम एच ३६ एफ ८६९२ आणि एम एच ३६ एए १२९२ रेती वाहतूक करताना थांबविले. वाहतुक परवाना आणि वाहनांची कागदपत्रे नसल्याचे चालकांनी तहसीलदारांना सांगितले. टिप्परचा पंचनामा केल्यानंतर तलाठी व कोतवालांना टिप्परमध्ये बसवून तुमसर तहसील कार्यालयात घेवून जाण्याचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्देचिचोलीचे प्रकरण : तहसीलदारांनी दिली पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर धावून जाणाऱ्या रेतीतस्काराविरुध्द महसूल प्रशासन एकवटले असून खुद्द तहसीलदारांनी तुमसर पोलीस ठाण्यात रेती तस्करांविरुध्द तक्रार दिली आहे.तुमसर तालुक्यातील चिचोली फाट्यावर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्या भरारी पथकाने टिप्पर क्रमांक एम एच ३६ एए ०५४८, एम एच ३६ एफ ८६९२ आणि एम एच ३६ एए १२९२ रेती वाहतूक करताना थांबविले. वाहतुक परवाना आणि वाहनांची कागदपत्रे नसल्याचे चालकांनी तहसीलदारांना सांगितले. टिप्परचा पंचनामा केल्यानंतर तलाठी व कोतवालांना टिप्परमध्ये बसवून तुमसर तहसील कार्यालयात घेवून जाण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान चिंचोली येथील बाजार चौकात टिप्पर येताच अचानक थांबविण्यात आले. एका चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच इसमांनी हातात हातोडा घेवून ट्रकमध्ये बसलेल्या तलाठी व कोतवालाला धमकावून खाली ओढले. तर एका तरुणाने टिप्पर चालकांना रेती रस्त्यावर रिकामे करण्याचे सांगितले. त्यावरुन टिप्पर चालकांनी भर रस्त्यावर रेती टाकणे सुरु केले. त्यावेळी तहसीलदार गजेंद्र बालपांडे, कोतवाल अजय मावळे, तलाठी पंकज बावनकुळे, अरुण गुप्ता, सचिन बागडे, राजेंद्र कदम, कोतवाल संजय बोरकर यांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी रेतीतस्कर तहसीलदारांच्या अंगावर धावून आले. बाजाराचा दिवस असल्याने नागरिक मदतीला धावुन आल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान भर रस्त्यात रेती टाकून टिप्पर चालक पसार झाले त्यामुळे आंतरराज्यीय रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. काही वेळानंतर जेसीबीच्या मदतीने रेती दुर करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.मंगळवारी तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारी रेती चोरी करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, आदेशाची अवमानना करणे, तलाठी व कोतवालाला धमकावणे, हातोडा घेवून अंगावर धावून येणे आदी तक्रारी नमुद करण्यात आले आहे.विशेष म्हणजे टिप्पर क्रमांकात तफावत असून वाहनाच्या कागदपत्रात खोडतोड दिसून आली. वाहनाची नोंदणीही झाली नसल्याचे पुढे आले. तहसीलदाराच्या अंगावर रेती तस्कर धावून जाण्याच्या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.सोमवारी सायंकाळी ५ वाजता चिंचोली येथे रेतीमाफीया अंगावर धावून आले. जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांच्या सहकार्याने अनर्थ टळला. आपण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.- गजेंद्र बालपांडे,तहसीलदार, तुमसर

टॅग्स :sandवाळू