शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली घेतल्या परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 00:40 IST

कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती मार्फत सायकली वितरीत करण्यात आल्या होत्या.

पालकांत संताप : मोहाडी पंचायत समितीचा प्रतापमोहाडी : कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती मार्फत सायकली वितरीत करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक १६ सप्टेंबरला पंचायत समिती मोहाडी येथील काही अधिकारी, कर्मचारी यांनी कांद्रीला येवून दिलेल्या सायकली परत करण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला व काही विद्यार्थ्यांच्या सायकली जबरीने आपल्या ताब्यात घेतल्या असा आरोप संतप्त पालकांनी येभे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला.समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामसभेतून निवड झाल्याचे प्रमाणपत्र, मुख्याध्यापकाचे शाळेपासून घरापर्यंतचे अंतर दोन कि.मी. पेक्षा जास्त असल्याचे प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, तसेच खंड विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागतो. कांद्री येथील अनेक विद्यार्थ्यांनी असे अर्ज पंचायत समिती मोहाडी येथे दाखल केले होते. संपूर्ण विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून त्यापैकी २४ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाने मंजूर केले. त्यामुळे पंचायत समिती मोहाडी येथून या २४ विद्यार्थ्यांना सायकली वितरीत करण्यात आल्या. मात्र काही दिवसानंतर या विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली परत करण्यासाठी मोहाडी पंचायत समितीकडून पत्र देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना सायकली प्राप्त झाल्या त्यांच्या आनंदात या पत्राने विरजण घातले. आपल्या सायकली परत घेतल्या जातील या भितीने काही विद्यार्थ्यांनी शाळेतच जाणे बंद केले तर काही विद्यार्थी सायकली ऐवजी पायीच शाळेत जावू लागले. मात्र एकाही विद्यार्थ्याने सायकल परत केली नाही. १६ सप्टेंबरला पंचायत समिती मोहाडी येथील काही अधिकारी व कर्मचारी कांद्री येथे आले व त्यांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर काही विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांना पाठवून विद्यार्थ्यांच्या घरुन त्या सायकली उचलून आणण्यात आल्या. या प्रकरामुळे मात्र विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला असून काही विद्यार्थ्यांना ताप सुद्धा आला असल्याचे पालकांनी सांगितले. दिलेल्या सायकली आम्ही कोणत्याही परिस्थितीत परत करणार नाही, आमच्या अर्जात त्रुटी होत्या तर मग अर्ज झोपेत तपासून मंजूर करण्यात आले काय? सायकली वाटप केल्यानंतर पुन्हा चौकशी कशी काय करण्यात आली. असा सवाल संतप्त पालकांनी केला आहे. पत्रपरिषदेला माजी आमदार अनिल बावनकर, राजेंद्र वंजारी, शशीकांत नागफासे, सुरचंद नागपुरे व पालक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)देण्यात आलेल्या सायकली बद्दल तक्रार प्राप्त झाल्याने समाज कल्याण विभागातर्फे चौकशी करण्यात येऊन त्या सायकली परत घेण्यात येत आहेत. जे खरोखर लाभार्थी असतील त्यांना त्या सायकली वितरीत केल्या जातील.- गजानन लांजेवार, गटविकास अधिकारी, पं.स. मोहाडी.