शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात पारा ४२.५ अंशावर

By admin | Updated: April 21, 2015 00:23 IST

उन्हाळ्याची तीव्रता काय आहे ती मंगळवारी भंडाराकरांना जाणवली.

भंडारा : उन्हाळ्याची तीव्रता काय आहे ती मंगळवारी भंडाराकरांना जाणवली. उष्णतेने यावर्षीचा उच्चांक गाठला. आजचे तापमान ४२.५ अंश सेल्सीअस नोंद करण्यात आली. आजच्या तापमानामुळे शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठ ओस पडली होती.वैषाख वणवा म्हणून ओळखला जाणारा वैषाख वणवा सुरु झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोठया प्रमाणात उष्णता राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाळयातून मोठा दिलासा मिळाला. आठवडाभर थंडीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अचानकपणे आता उष्णतेची प्रखरता जाणवू लागली आहे. मागील दोन दिवसांपासून तापमानात काही प्रमाणात वाढ झाली होती. आज यावर्षीचे उष्णतामानाचे विक्रम गाठला असून हवामान खात्याने भंडारा येथे ४२.५ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद केली आहे. आजच्या तापमानामुळे अगदी सकाळी १० वाजेपासूनच उन्हाची प्रखरता जाणवू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे औचित्याचे समजले नाही. उद्या अक्षयतृतीया हा महत्वाचा सण आहे. सणानिमित्त खरेदी करणा-यांची बाजारात मोठी गर्दी असते. उष्णतेमुळे अनेकांनी दुपारच्या वेळेस बाजारपेठेत जाणे टाळले. राष्ट्रीय महामार्गवरुन ऐरवी मोठी वर्दळ बघायला मिळते. मात्र, आजच्या विक्रमी तापमानामुळे बाजारपेठा तथा शहरातील मुख्य मार्ग निर्मनुष्य दिसून आले. आजच्या उष्णतेमुळे ख-या अर्थाने उन्हाळा सुरु झाल्याची प्रचीती नागरिकांना आल्याने अनेक दिवसांपासून बंद असलेले वातानुकूलीत यंत्र सुरु झाल्याचे सर्वत्र दिसत होते. (शहर प्रतिनिधी)