शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यकता १९ हजारांची, पुरवठा केवळ १,३०४ संचांचा

By admin | Updated: October 9, 2014 22:56 IST

केबल आॅपरेटर्सकडून होणारी ग्राहकांची लुट थांबावी, व महसुलात वाढ व्हावी, यासाठी शासनाने सेटअप बॉक्स लावण्याची सक्ती केली आहे. भंडारा जिल्ह्यात १९ हजार केबल जोडणीधारक असताना आतापर्यंत

प्रशांत देसाई - भंडाराकेबल आॅपरेटर्सकडून होणारी ग्राहकांची लुट थांबावी, व महसुलात वाढ व्हावी, यासाठी शासनाने सेटअप बॉक्स लावण्याची सक्ती केली आहे. भंडारा जिल्ह्यात १९ हजार केबल जोडणीधारक असताना आतापर्यंत केवळ १,३०० सेट-टॉप बॉक्सचा पुरवठा करण्यात आला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बॉक्स लावण्याची सक्ती केली असली तरी जिल्ह्याला १८ हजार सेट-टॉप बॉक्सची गरज आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत करमणूक विभागात जिल्ह्यातील ७६ केबल आॅपरेटर्सची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातुन १९,३०४ जोडणीधारकांना केबलचे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या केबल जोडणीधारकांना सेट-टॉप बॉक्स देण्याच्या दृष्टीने फार्म देण्यात आले. शासनाच्या तिजोरीत महसुलाची वाढ व्हावी, यासाठी शासनाने एका परिपत्रकानुसार ३१ डिसेंबरपर्यंत सर्व केबल जोडणीधारकांनी सेट-टॉप बॉक्स लावण्याचे निर्देश आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्याला १९,३०४ सेट-टॉप बॉक्सची गरज असताना संबंधीत कंपनीने जिल्ह्याला केवळ १,३०० बॉक्सचा पुरवठा केला आहे.सेट-टॉप बॉक्समुळे ग्राहकांची केबल आॅपरेटर्सकडून होणारी लुट थांबणार असून शासनाच्या महसुलात वाढ होईल. सोबतच ग्राहकांना वाहिण्या बघण्याची सेवा, डिजीटल क्वॉलिटी, चॅनलची संख्या व सुस्पष्टता राहणार आहे. बॉक्स लावण्याने पे-चॅनलवाल्यांचाही प्रती ग्राहकांमागे लाभ होणार आहे. जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत हे बॉक्स लावायचे असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली आहे.जिल्ह्यात केबल आॅपरेटर्सच्या माध्यमातून टिव्हीवर विविध चॅनलचे प्रक्षेपण करण्यात येत आहे. याबदल्यात आॅपरेटर्सकडून ग्राहकांची आर्थिक लुट करण्यात येत आहे. केबल आॅपरेटर्सनी ग्राहकाला जोडणी देताना कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे निर्देश आहेत. असे असतानाही आॅपरेटर्स जोडणीच्या नावावर ग्राहकांकडून अग्रीम राशी म्हणून पाचशे रूपयापर्यंतची आकारणी करीत आहे. मात्र याची कुठलीही पावती ते ग्राहकांना देत नाही. ही रक्कम विनापरतावा असल्याचे सांगण्यात येते. यामुळे आॅपरेटर्सकडून ग्राहकांची लुट होत असल्याचे दिसून येत आहे. केबल आॅपरेटर्सला महसूल विभागाला कर भरावा लागतो. त्यात ग्रामीण भागाकरिता प्रति ग्राहक १५ रूपये, नगरपालिका व शहरी भागाकरिता ३० रूपये व महानगर भागातील ग्राहकांसाठी ४५ रूपये अशा स्वरूपाची आकारणी करण्यात आली आहे. केबल आॅपरेटर्सवर महसुल विभागाचे नियंत्रण नसल्याने त्यांच्याकडील ग्राहक जोडणीची संख्या शासनाला न दाखविता मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे.आॅपरेटर्सच्या कारभारावर नियंत्रण यावे, यासाठी शासनाने देशातील सर्व मोठ्या शहरासह ग्रामीण भागातही सेट-टॉप बॉक्सची जोडणी अनिवार्य केली आहे. मागील चार वर्षापासून देशभरातील काही मोठ्या शहरात हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यात शासनाला महसुल वाढविण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे शासनाने ही संकल्पना पालिकाक्षेत्र, शहरी व ग्रामीण भागात कार्यान्वित करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे.