शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र बांधकामासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: August 26, 2016 00:38 IST

तालुक्यातील केसलवाडा वाघ प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी शासनाने जागा आणि निधी उपलब्ध केला असला

लाखनी : तालुक्यातील केसलवाडा वाघ प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी शासनाने जागा आणि निधी उपलब्ध केला असला तरी जि.प. पदाधिकाऱ्याच्या दबावापोटी आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकारी यांचेकडून वेळकाढू धोरणाचा अवलंब करण्यात येत असल्याने मागील एक वर्षापासून इमारत बांधकाम रखडले आहे. तात्काळ बांधकाम सुरू करावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश वासनिक यांनी दिपक सावंत आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा यांना निवेदन दिले आहे.लाखनी येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा वाघ येथे २००५ साली स्थानांतरीत करण्यात आले. त्यात लाखनी, मुरमाडी सावरी, गराडा, केसलवाडा, धारगाव, किन्ही, सोनेखारी आदी गावांचा समावेश आहे. इमारती अभावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज जि.प. प्राथमिक शाळेच्या खोल्यामधून चालविले जाते. ग्रामपंचायत कडून प्राथमिक आरोग्य केंद्रास गावाजवळील जलकुंभाजवळील सरकारी जागा देण्याचा ठराव पारीत करून संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला. २७ जुलै २०१५ रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांनी सरकारी जागा गट क्रमांक ६१९ आराजी ०.९३ हेक्टर आर जागेचा बांधकामासाठी आगावू ताबा दिल्याचे निवेदनात नमुद आहे.प्रस्तावित बांधकामासाठी ४ कोटी ९५ लाख रूपये पैकी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १ कोटी रूपये शासनाने जिल्हा परिषद भंडाराचे बॅक खात्यात जमा केल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश वासनिक यांचे म्हणने आहे. सदर निधी मार्च २०१६ पर्यंत खर्च करण्याचे शासनाचे निर्देश असताना माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व बांधकाम सभापती यांचे दबावामुळे मागील एक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम रखडलेला आहे. रखडलेले बांधकामाचे लवकरात लवकर भूमिपूजन करून काम सुरू करावे व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी याकरिता स्वातंत्र्यदिनी सामाजिक कार्यकर्ता दिनेश वासनिक, रवि कानेकर, ईश्वर नागलवाडे, रमेश हलमारे, उमेश शेंडे, रविकांत सरोदे यांनी भंडारा येथे जावून पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)