शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावशाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

भंडारा : रेमडेसिविर हे काेराेनावर रामबाण औषध आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे रुग्ण बरा हाेताे. गंभीर रुग्णाचा मृत्यू हाेत नाही किंवा ...

भंडारा : रेमडेसिविर हे काेराेनावर रामबाण औषध आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे रुग्ण बरा हाेताे. गंभीर रुग्णाचा मृत्यू हाेत नाही किंवा फुप्फुसातील संसर्ग कमी करताे, हा जनतेतील गैरसमज आहे. हे औषध काेराेनासाठी प्रभावशाली नसून वैद्यकीय क्षेत्रात इतर औषधी यापेक्षाही उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी रेमडेसिविर मिळत नाही म्हणून भयभीत हाेऊ नये, असे आवाहन सेवाग्राम (वर्धा) येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. एस.पी. कलंत्री यांनी केले आहे.

रेमडेसिविर हे इंजेक्शन काेराेना रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे किंवा आयसीयूमधील रुग्णांचे दिवस कमी करणे, तसेच फुप्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी काेणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे त्यांनी संशाेधनाअंती म्हटले आहे.

साेशल मीडियाने या औषधाबद्दल समाधान, गैरसमज पसरविला आहे. एखादा व्यक्तीला काेराेना झाला आणि रेमडेसिविर मिळत नाही म्हणजे आता मृत्यू अटळ आहे असा भ्रम लाेकांमध्ये तयार हाेणे भीतीदायक आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, डाॅक्टरांवर रेमडेसिविर देण्यासाठी दबाव आणतात. रेमडेसिविरशिवाय इतर अनेक औषधींमुळे काेविड रुग्ण बरा हाेताे. सेवाग्राम (वर्धा) रुग्णालयात रेमडेसिविरचा उपयाेग न करता अनेक रुग्ण बरे झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा अट्टहास करण्याची गरज नाही. विना रेमडेसिविर इंजेक्शननेही रुग्ण पूर्णपणे बरा हाेऊ शकताे, असेही डाॅ. कलंत्री यांनी सांगितले. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी या काळात संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.

जगातील २८ देशांमध्ये संशाेधन

जगातल्या २८ देशांमध्ये झालेल्या संशाेधनातून जागतिक आराेग्य संघटनेनेसुद्धा रेमडेसिविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. डब्ल्यू एचओने म्हटले की, २८ देशांतल्या ७४३३ काेराेनाबाधितांवर संशाेधन केले. यातील काही रुग्णांना रेमडेसिविर दिले, तर काही रुग्णांवर इतर औषधांनी उपचार केले. त्यावेळी रेमडेसिविर औषधाचा फारसा उपयाेग हाेत नसल्याचे सिद्ध झाले असल्याचेही डाॅ. कलंत्री यांनी सांगितले.