शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.चे दर कमी करा

By admin | Updated: November 6, 2014 22:50 IST

एस.टी.चे तिकीट दर त्वरित कमी करण्यात यावी, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

मनसेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : एस.टी.चे तिकीट दर त्वरित कमी करण्यात यावी, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.देशातील केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल नियंत्रणमुक्त केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंती घसरल्यामुळे मागील पंधरा दिवसाच्या अंतरात ५.५० रूपये हून अधिकची घसरण डिझेलच्या दरात दोन टप्प्यामध्ये झालेली आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरू असलेला एस.टी. विभाग डिझेलचे दर वाढले की लगेच एसटीचे तिकीट दरही वाढवायला विलंब लावत नाही. मात्र पंधरा दिवसांपासून देशभरात डिझेलचे दर कमी होवूनही राज्य परिवहन महामंडळ आता तिकीट दर कमी करण्याच्या ऐवजी मुंग गिळून बसलेले आहे. रापमंने वाढविलेले तिकीटांचे दर त्वरित कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करीत आहे.एकीकडे रापम हे एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी हे स्वत:साठी ब्रीदवाक्य वापरते. प्रत्यक्षात मात्र स्वत:च्या चुकांमुळे, कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे तोट्यात आलेले महामंडळ अशाप्रकारे जनतेची लुट करून स्वत:चा तोटा भरून काढण्याच्या प्रकाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा तीव्र विरोध असून जोपर्यंत वाढलेले डिझेलचे भाव कमी झालेले नाहीत, तोपर्यंत रापमतर्फे तिकीटांचे दर हे कमीच ठेवून जनतेला दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे संजय रेहपाडे, भरत वंजारी, धनंजय धुळसे, विशाल लांजेवार, प्रमोद मेंढे, ग्यानी घाटोळे, नजीर बांते, गुरूदेव बावनकर, प्रमोद सार्वे, मयुर लांजेवार आदींनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)