शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ म्हणून साक्षात जिल्हाधिकारी पाठीशी उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

सततची नापिकी आणि कर्जाचा डाेंगर या दाेन खचलेल्या शेतकऱ्यांनी टाेकाचा मार्ग स्विकारत आत्महत्या केली. लाखनी तालुक्यातील डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव पंढरी फुंडे, मुरमाडी तुपकर येथील नारायण पंढरी भाेयर आणि राजेश नामदेव काेरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे कुटुंबाची ओढाताण सुरु झाली.

ठळक मुद्देभाऊबीजेची अनाेखी भेट : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब

मुखरु बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर :
संवेनशील मनाचा अधिकारी असला की प्रशासनाच्या रुक्षपणातही माणुसकीचा झरा वाहताे. याचा प्रत्यय भाऊबीजेच्या दिवशी आला. साक्षात जिल्हाधिकारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुबाच्या घरी पाेहाेचले. शेतकरी विधवानी जिल्हाधिकाऱ्यांना ओवाळले. तर ओवाळणी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वताेपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कर्ता पुरुष गमावल्यानंतर काेसळलेल्या संकटाच्या काळात आता भाऊ म्हणून साक्षात जिल्हाधिकारी म्हणून पाठीशी उभे झाले. 
सततची नापिकी आणि कर्जाचा डाेंगर या दाेन खचलेल्या शेतकऱ्यांनी टाेकाचा मार्ग स्विकारत आत्महत्या केली. लाखनी तालुक्यातील डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव पंढरी फुंडे, मुरमाडी तुपकर येथील नारायण पंढरी भाेयर आणि राजेश नामदेव काेरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे कुटुंबाची ओढाताण सुरु झाली. कुटुंबाचा गाढा ओढताना त्रेधा उडू लागली. आप्तस्वकीयांच्या आधाराने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा संसराचा गाढा ओढू लागल्या आहे. दिवाळीसारखा सणही या कुटुंबाच्या नशीबी नव्हता. 
अशातच संवेदनशील मनाचे जिल्हाधिकारी संदीप कदम भाऊबीजेच्या दिवशी थेट डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव फुंडे यांच्या घरी पाेहाेचले. जिल्हाधिकारी दारात पाहून सर्व अचंबित झाले. भाऊबीजेला आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना वंदना सुखदेव फुंडे यांनी ओवाळणी घातली. नियमांच्या अधिन राहून माणुसकीच्या नात्याने जे शक्य हाेईल ते सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. यावेळी गावकऱ्यांसाेबत चर्चा केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे, तुडतुड्याने झालेल्या नुकसानीची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्या समस्यांचीही दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यानंतर मुरमाडी तुपकर येथील नारायण भाेयर आणि राजेश काेरे यांच्या घरी पाेहाेचले. तेथेही पुष्पा नारायण भाेयर आणि रेवता राजेश काेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भाऊबीजेचे औक्षवण केले. संवेदनशील मनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबात भाऊबीज साजरी करुन एक नवा आदर्श निर्माण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शीवराज पडाेळे, समाजकल्याण उपायुक्त आशा कवाडे, तहसीलदार मलीक विराणी, सरपंच ताराचंद निरगुडे, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, राकेश पंधरे आदी उपस्थित हाेते.

तहसीलदारांची भाऊबीज
लाखांदूर :
प्रशासनाचा प्रमुखच संवेदनशील मनाचा असला की सर्व प्रशासनही संवेदनशील हाेते. लाखांदूरचे तहसीलदार निवृत्ती उईके आणि पर्यवेक्षाधीन प्रदीप सेवाळ यांनी तालुक्यातील खाेलमारा येथे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुबात जावून भाऊबीज साजरी केली. यावेळी वंदना ईश्वर मदनकर या विधवा बहिनीने त्यांना ओवाळले.