शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हटविलेल्या अतिक्रमित जागेवर पुन्हा अतिक्रमण

By admin | Updated: July 26, 2014 23:58 IST

येथील दिवसेंदिवस वाढत असलेला अतिक्रमण ग्रामपंचायतने लक्षात घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली यात बाजार चौक, स्मशानभूमी, ढोरफोडी व रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण हटविले.

चिचाळ : येथील दिवसेंदिवस वाढत असलेला अतिक्रमण ग्रामपंचायतने लक्षात घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली यात बाजार चौक, स्मशानभूमी, ढोरफोडी व रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण हटविले. मात्र ढोरफोडी व बाजार चौकात पुन्हा अतिक्रमण केल्याने मेलेल्या जनावरांना कुठे टाकावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पवनी तालुक्यातील चिचाळ हे पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. चिचाळला जिल्हा परिषद व पंचायत समिती असे दोन क्षेत्र आहेत. अनेकदा या गावाला जि.प. व पं.स. ची दोन्ही पदे भुषविली आहेत. मात्र २० वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण, बाजारचौकातील वाढलेले अतिक्रमण स्मशानभूमी, ढोरफोडीमध्ये अतिक्रमण करुन केलेली शेती व माळरान जागेवरील अतिक्रमण केल्याने पाळीव जनावरांना चराईसाठी जागा शिल्लक राहिली नाही. ढोरफोडी जागेवर एका अतिक्रमणधारकाने ३ ते ४ एकर शेती तोडल्याने मेलेली जनावरे रस्त्यावर व काहींनी स्मशानभूमीत टाकीत होते. मात्र ग्रामपंचायतने टोकाची भूमिका घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवून गावनाते संबंध बाजूला ठेवून बाजारातील अतिक्रमण, स्मशानभूमीतील व ढोरफोडी जागेवरील अतिक्रमण व पाळीव जनावरांच्या चराईच्या जागेवर शेतीचे सपाटीकरण करण्यात आले. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने ढोरफोडी येथे हटविण्यात आलेला अतिक्रमण पुन्हा केल्याने मेलेल्या जनावरांना कुठे टाकावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ढोरफोडी जागेवर अतिक्रमण केल्याने तो दुसरीकडे त्यांची विल्हेवाट लावली तर कुणीही आपल्या हद्दीजवळ टाकण्यास मनाई करीत आहेत. त्यामुळे त्यांनी जनावरे नेण्याचे बंदच केले. त्यामुळे येथील जनता मिळेल त्या ठिकाणी मेलेले जनावरे टाकीत असून सर्वत्र दुर्गंधी पसरवित आहेत.ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन ढोरफोडीत जावे व मेलेले जनावरे येथे टाका असे त्या अतिक्रमण धारकाला सांगल्यास संबंधित इसम जनावरे नेण्यास तयार असल्याचे लोकमतजवळ सांगितले.(वार्ताहर)