कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राशन दुकानदारही सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:28+5:30

मोहाडी तालुका प्रशासनाच्या अन्न पुरवठा विभागाचे वतीने कोरोना व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील १०१ सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात आला. धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थी कार्डधारांचे पॉस मशीनवर अंगठे घेण्याअगोदर त्यांचे हात साबणाने स्वच्छ धुण्यात यावे.

The ration shopkeeper also moved to prevent the spread of corona | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राशन दुकानदारही सरसावले

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राशन दुकानदारही सरसावले

Next
ठळक मुद्देअन्न पुरवठा विभागाचा उपक्रम : दुकानात येणाऱ्या कार्डधारकांचे साबणाने धुतले जाताहेत हात

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोरोना व्हायरसला प्रतिबंध लावण्याच्या हेतूने मोहाडी तालुका अन्न पुरवठा विभागाचे अन्न निरीक्षक सागर बावरे यांचे सूचनेनुसार स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्नधान्यासाठी दुकानात येणाºया लाभार्थ्यांचे पॉस मशीनवर अंगठा घेण्याअगोदर हात साबणाने स्वच्छ धुवून व टॉवेलने पुसून सावधानता बाळगण्यासंबंधी सूचना देण्याचा उपक्रम रविवारपासून राबविण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्याच दिवशी कांद्री, बेटाळा व पाहुणीच्या दुकानदारांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे कौतूक होत आहे.
मोहाडी तालुका प्रशासनाच्या अन्न पुरवठा विभागाचे वतीने कोरोना व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील १०१ सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात आला. धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थी कार्डधारांचे पॉस मशीनवर अंगठे घेण्याअगोदर त्यांचे हात साबणाने स्वच्छ धुण्यात यावे. ही प्रक्रिया राबविताना लाभार्थी अन्न कार्ड धारकांना घ्यावयाची दक्षता यासंबंधी सूचना देण्यासंबंधी कळविण्यात आले. सूचना प्राप्त होताच कांद्रीचे स्वस्त धान्य दुकानदार आर.बी. बन्सोड, पाहुणीचे हरिभाऊ धुर्वे, बेटाळाचे श्रीमंत तिजारे यांनी पहिल्याच दिवशी धान्य वाटप करताना या उपक्रमाचा प्रारंभ केला.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याचे हेतूने स्वस्त धान्य दुकानदारांना सदर उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. पहिल्या दिवशी उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. इतर सर्व दुकानदारही उपक्रम राबविणार आहेत. परंतु नागरिकांनी यासंबंधी घाबरु नये, दक्षता घेणे गरजेचे आहे. शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावे, वारंवार तोंडाला किंवा चेहºयास हात लावू नये.
-सागर बावणे, अन्न पुरवठा निरीक्षक मोहाडी.

Web Title: The ration shopkeeper also moved to prevent the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.