जिल्ह्याला पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:46+5:30

जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. आंधळगाव येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. हिवरा चेकपोस्टवर पोलिसांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात आलेली राहूटी वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. मोहाडी शहरात मेघगर्जनेसह पाऊस बरसल्याने दोन तासांपेक्षा जास्त वीज पुरवठा खंडीत राहिला.

Rains hit the district | जिल्ह्याला पावसाचा तडाखा

जिल्ह्याला पावसाचा तडाखा

Next
ठळक मुद्देरबी हंगामाला फटका : खरिपाच्या मशागतीसाठी उत्तम, भाजीपाला पिकांवर संक्रात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व पाऊस बरसला. विजांचा कडकडाट, सुसाट वारा व त्यानंतर पाऊस बरसला. या पावसाने रबी हंगामांतर्गत अंतीम टप्यात असलेल्या शेतीच्या कामाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कापणी झाली असून मळणीही झाली आहे. खरेदीसाठी ठेवलेले धान ओले झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. आंधळगाव येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. हिवरा चेकपोस्टवर पोलिसांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात आलेली राहूटी वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. मोहाडी शहरात मेघगर्जनेसह पाऊस बरसल्याने दोन तासांपेक्षा जास्त वीज पुरवठा खंडीत राहिला.
तुमसर शहरासह काही ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची प्राथमिक माहिती आहे. लाखनी येथे मेघगर्जनेसह पाऊस बरसला. विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने आबालवृध्दांची गैरसोय झाली होती. पालांदूर परिसरातही वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. वीज पुरवठाही खंडीत झाला.
भंडारा तालुक्यातील शहापूर, जवाहरनगर, फुलमोगरा, उमरी, सावरी, परसोडी, ठाणा पेट्रोलपंप, खरबी नाका येथे पाऊस बरसला.

उकाड्यापासून भंडारेकरांची सुटका
रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस बरसल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. २५ मे पासून नवतपाला प्रारंभ झाल्यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत होती. अंगाची लाहीलाही होत असताना पाऊस केव्हा बरसेल याचा प्रतीक्षेत नागरिक होते. नवतपात पाऊस बरसतो असे जानकारांचे मत आहे. या मताला वरुण राजानेही खरे ठरविले. पावसाने जिल्हावासीयांची उकाड्यापासून थोडा वेळ का असेना सुटका केली.

Web Title: Rains hit the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस