शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी वसुंधरेला पावसाची संजीवनी

By admin | Updated: July 2, 2016 00:36 IST

वृक्ष लागवड करण्यासाठी पाऊस येईल काय, अशी चिंता तहसिलदारांना सतावत होती.

प्रोजेक्ट ग्रीनची प्रशंशा : जिल्हाधिकाऱ्यांनी लावले वृक्षराजू बांते  मोहाडीवृक्ष लागवड करण्यासाठी पाऊस येईल काय, अशी चिंता तहसिलदारांना सतावत होती. त्यांनी वृक्षासाठी पाण्याची व्यवस्था केली होती पण, 'प्रोजेक्ट ग्रीन'ला निसर्गाची साथ मिळाली. अन् दुपारनंतर वृक्ष लागवड करण्यासाठी वसुंधरेला पावसाची संजिवनी मिळाल्याचा आनंद अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येत होता.आज दोन कोटी वृक्षारोपण लागवडीचा संकल्प शासनाने राबविला. शासनाचा उद्देश सफल व्हावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. पण, तहसिल कार्यालय मोहाडीने वेगळेपण दाखविणारा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्विपणे राबविला. तहसिल कार्यालयाला २५ वृक्ष लागवडीचा उद्दिष्ट होते, असे असताना तहसिलदार धनंजय देशमुख यांनी प्रोजेक्ट ग्रीन ही संकल्पना मांडून जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा विशेष कार्यक्रम करून दाखविला. या संदर्भात लोकमतने प्रोजेक्ट ग्रीनची संकल्पना प्रकाशित केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विशेष दखल घेतली. त्यांनी मोहाडी येथे येण्याची स्वईच्छा तहसिलदार मोहाडी यांच्याकडे दर्शविली होती. त्यानुसार त्यांचे स्थानांतरण शिक्षण आयुक्त पुणे येथे झाले. ते येणार काय याकडे तहसिल कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा लागली होती. पण, योगायोग असा की, मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार व ज्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला ते अभिजित चौधरी मोहाडी येथे सायंकाळी ४.३० वाजता आले. त्यांच्यासह भंडारा जिल्हा पालक सचिव दिपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उपविभागीय अधिकारी संपत खिल्लारी या अधिकाऱ्यांचा ताफा मोहाडी तहसिलमध्ये पोहचला.जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार, पालक सचिव दीपक कपूर यासह सर्वांनी एक-एक रोपट्यांचे वृक्ष लागवड केली. विस्तीर्ण क्षेत्रात वृक्ष लागवड बघून प्रोजेक्ट ग्रीनची प्रशंशा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी केली. आज सकाळपासून ७५० वृक्षाची लागवड तहसिल परिसरात करण्यात आली. यापूर्वी सकाळी आमदार चरण वाघमारे यांनीही वृक्ष लावले. तीन हजार वृक्ष लागवडीचे संकल्प आहे. त्यासाठी विविध प्रकारची ३५ हजार रूपयांची दोन तीन वर्ष वयाची झाडे लागवडीसाठी आणली गेली आहेत. वृक्ष लागवड तर होईल. पण, पाण्याचे काय याबाबत तहसिलदारांना चिंता होती. त्यांनी पाण्याचे टँकर बोलावून घेतले होते. तथापि, दुपारी २ नंतर पावसाने प्रोजेक्ट ग्रीनला सलामी देवून वृक्ष लागवडीला पावसाची संजीवनी दिली. यावेळी धान्य दुकानदार, केरोसीन दुकानदार, तलाठी, कोतवाल, गावातील तरूणांनी वृक्ष लागवड केली.अन् नागरिकांना आश्चर्य झाला...आज मोहाडी येथे जिल्हाधिकारी येणार हे ठरलं होते. पण, अचानक मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार, सद्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी मोहगाव/देवी येथे येवून सर्वांना आश्चर्यांचा धक्का दिला. दोन्ही जिल्हाधिकारी व पालक सचिव दिपक कपूर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात न बसता त्यांनी चावडीवर बसणे पसंत केले. जिल्हाधिकारी येण्याची खबर गावात पोहचताच नागरिकांनी चावडीवर गर्दी केली. यावेळी सरपंच राजेश लेंडे, ग्रामसेवक भास्कर डोमळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. वृक्षलागवडी संबंधी, रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्यांनी मजुरी मिळाली काय, शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप केला गेला काय, शेतीची स्थिती, गावातील समस्या आदी बाबीची चौकशी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व धीरजकुमार यांनी संवाद साधला. जलशिवार योजनेत गाव आणण्यासंबंधी ग्वाही दिली. गावकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्षपणे सरपंच राजेश लेंडे यांनी मांडल्या. यावेळी राजेंद्र निंबाळकर, खिल्लारी, धनंजय देशमुख, गजानन लांजेवार, ललीत कुंभरे, तुरकर तसेच ग्यानीराम साखरवाडे, उमेद लेंडे, सुनिल धांडे, मिताराम साखरवाडे, श्रीराम आंबिलकर, धनंजय काळे, सुभाष साठवणे उपस्थित होते.गाव विकासाचे स्वप्न साकारत ते पूर्णत्वास जात आहेत. तथापि प्रशासकीय अडचणी येतात. त्यामुळे गावाच्या विकासात अडथडा येतो. अधिकाऱ्यांनी सामाजिक दृष्टीकोन ठेवून जनप्रतिनिधींना सहकार्य करावे.-राजेश लेंडे, सरपंच, मोहगाव/देवी.