अड्याळ येथे जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:08+5:302021-09-17T04:42:08+5:30

मागील काही दिवसांपासून अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीत विशेषतः अड्याळमध्ये एक नाही तर ठिकठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती अड्याळ ...

Raid on a gambling den at Adyal | अड्याळ येथे जुगार अड्ड्यावर धाड

अड्याळ येथे जुगार अड्ड्यावर धाड

मागील काही दिवसांपासून अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीत विशेषतः अड्याळमध्ये एक नाही तर ठिकठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती अड्याळ पोलिसांना मिळाली. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अड्याळ बस थांबा परिसरातील खातकुडाच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेवर पोलिसांनी धाड मारली. घटनास्थळाहून ५२ पत्ते, दोन मोबाइल तथा चार जणांच्या जवळून २४ हजार २८० रुपये असा एकूण ३४ हजार २८० रुपये हस्तगत करून एकूण ८ जाणांविरुद्ध कलम १२(अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवरखेले, किन्नाके यांनी केली.

गावात ठिकठिकाणी जुगार खेळला जात असला तरी त्याठिकाणी सोना, दुचाकी वाहन, मोबाइल तथा एखाद्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही घेऊन तथा वस्तू गहाण ठेवून अवैधरीत्या पैसे दिले जातात, अशी गावात चर्चा आहे. जुगाराच्या नादात अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. यावरही आता पोलीस विभागाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Raid on a gambling den at Adyal