शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सिंलिडर्ससाठी रांगच रांग

By admin | Updated: October 28, 2014 22:51 IST

सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू आहे. या सणात गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र मागील काही दिवसापासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना विशेषता

मोहाडी : सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू आहे. या सणात गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र मागील काही दिवसापासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना विशेषता महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील पाच सहा दिवसापासून तर सिलिंडरच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. खरोखरच गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे की गॅस एजेंसीधारकाने कृत्रिम टंचाई निर्माण केली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सिलिंडरसाठी नागरिक एजंसीच्या कार्यालयासमोर लांबच लांब रांगा लावत आहेत. तासनतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने ऐन सणासुदीच्या दिवसावर विरजन पडत आहे. दिवाळीचा सण हा १० ते १२ दिवसांचा असतो. या सणात प्रत्येक घरात खाद्य पदार्थ बनविले जातात. पाहुण्यांची रेलचेल असते. ग्रामीण भागात त्यावेळी मंडई, दंडारची धुम असते. याच पर्वात मुलामुलींच्या लग्नाची बोलणी केल्या जात असते. त्यामुळे पाहुण्यांची रेलचेल काही जास्त प्रमाणातच असते. अशावेळी सिलिंडरचा तुटवडा हा परिवारासाठी मनस्ताप निर्माण करणारा ठरत आहे. सिलिंडरचा नंबर लावल्यावर त्वरीत सिलिंडरची पुर्तता होईल, असे सांगण्यात येते. मात्र येथे याउलट स्थिती निर्माण झाली आहे. नंबर लावल्यानंतरही आठ ते १५ दिवसानंतर सिलिंडर देण्यात येते. गॅस एजंसीला त्यांच्या कोट्यानुसार सिलिंडरचा पुरवठा केला जातो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग हे सिलिंडर जातात तरी कुठे असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवसातच नेहमी सिलिंडरचा तुटवडा निर्माण होत असल्याने एजंसीच्या कार्यपद्धतीवर आणि संबंधित विभागाच्या भूमिकेवर शंका येत आहे. (शहर प्रतिनिधी)