क्वारंटाईन सेंटरच बिघडवितेय आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:58+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती करूनही तसूभरही फरक दिसत नाही. येथे तर क्वारंटाईन सेंटरचीच पिकदानी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक असो, सफाई कामगार असो की येथे क्वारंटाईन असणारे व्यक्ती खोलीच्या खिडकीतूनच पिंक मारतात. बहुतांश खर्रा शौकीन कोण कोणाला टोकणार. स्वच्छतेचे निकष पाळले जात नाही. महिलांची निवासी व्यवस्था असलेल्या खोल्यांना पडदे नाही, दररोज स्वच्छता होत नाही, .....

Quarantine centers only worsen health | क्वारंटाईन सेंटरच बिघडवितेय आरोग्य

क्वारंटाईन सेंटरच बिघडवितेय आरोग्य

googlenewsNext
ठळक मुद्देखर्ऱ्याच्या पिचकाऱ्या : अधिकारीही घाबरतात आत येण्यास, अधिकारी एकच काम प्रामाणिकपणे करतात ते म्हणजे टोलवाटोलवी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महानगरातून जिल्ह्यात येत असाल तर एकदा विचार करा. शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये राहिला तर चांगला आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रशस्थ वाटणाऱ्या इमारतीत आत शिरले की भ्रमनिराश होतो. ठिकठिकाणी पान-खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या आणि स्वच्छतेचा अभाव दिसतो. आतमध्ये राहणाऱ्यांना जणू कोरोनाच झालाय या भीतीपोटी अधिकारी, कर्मचारीही आत यायला घाबरतात, असा काहीसा अनुभव भंडारा लगतच्या राजेदहेगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेकांनी घेतला आहे. तक्रार करावी तर गाईड लाईन्सच्या नावाखाली सुरू असते टोलवाटोलवी.
महानगरातून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी जिल्ह्यात क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. सर्व सुविधा येथे देण्याचे निर्देश शासन आणि प्रशासनाचे आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील राजेदहेगावच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पुण्याहून आलेल्या व्यक्तींना आलेला अनुभव अंगावर काटे आणणारा आहे.
राजेदहेगाव येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलींचे वसतीगृह आहे. बाहेरून निसर्गरम्य आणि प्रसस्त वाटणारी इमारत क्वारंटाईन सेंटरसाठी अतियश योग्य, मोकळा परिसर, हिरवाई, पक्षांचा किलबिलाट एकूणकच प्रसंन्न वातावरण परंतु एकदा का या इमारतीत तुम्ही शिरलात की तुमचा भ्रम निराश होतो. इमारतीच्या पायरीपासून दर्शन होते ते खर्रा शौकीनांनी मारलेल्या पिचकाऱ्यांचे. थुंकीवाटे कोरोना पसरतो, हे जग जाहीर आहे. या मुख्य उद्देशालाच येथे हरताळ फासला जातो. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती करूनही तसूभरही फरक दिसत नाही. येथे तर क्वारंटाईन सेंटरचीच पिकदानी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक असो, सफाई कामगार असो की येथे क्वारंटाईन असणारे व्यक्ती खोलीच्या खिडकीतूनच पिंक मारतात. बहुतांश खर्रा शौकीन कोण कोणाला टोकणार. स्वच्छतेचे निकष पाळले जात नाही. महिलांची निवासी व्यवस्था असलेल्या खोल्यांना पडदे नाही, दररोज स्वच्छता होत नाही, अशा परिस्थितीत राजेदहेगावचे क्वारंटाईन सेंटर चांगल्या व्यक्तीचेही आरोग्य बिघडविण्यास हातभार लावू शकते. क्वारंटाईन सेंटरला अधिकाऱ्यांनी भेटी देणे अपेक्षित आहे. भंडारा तहसीलदारांच्या अखत्यारीत सदर सेंटर आहे. परंतु ते एकदाही येथे फिरकले नाही. नोडल आॅफिसर आठवड्यातनू एकदा बाहेरच्या बाहेर भेटीची औपचारिकता पूर्ण करतात. आत राहणाऱ्यांना जणू कोरोनाच झालाय या भीतीपोटी येथील कर्मचारीही आत यायला घाबरतात.

पेड क्वारंटाईन सेंटरमध्ये लूट
भंडारा शहरात एका हॉटेलला पेड क्वारंटाईन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. परंतु दर अव्वाच्या सव्वा आहे. प्रती दिवसाला एका माणसाला अडीच हजार रूपये दर सांगण्यात येते. भोजनाचे ५०० रूपये वेगळे म्हणजे क्वारंटाईन नियमानुसार येथे आठ दिवस राहच झाल्यास साधारण २५ हजाराचा खर्च एका व्यक्तीचा होतो. परिवार असेल तर मग खर्चाचे विचारूच नका.

कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही
क्वारंटाईन सेंटरमध्ये मास्क न लावता फिरणारे अनेक महाभाग आहे. त्यांना अटकाव करणारा कोणीच नाही. अशातच कुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की अनेकांच्या उरात धडकी भरते. त्याच्यावर चर्चा रंगते. काहीवेळ गेला की चर्चा करणारेच खर्रा खाऊन पिंक मारतात. येथे काम करणारे सफाई कर्मचारी तीन तीन दिवस एकच हॅन्डग्लोव्हज वापरताना दिसतात. संयुक्त शौचालय आणि बाथरूम त्याचीही स्वच्छता केली जात नाही. कुणाचेच कुणावर नियंत्रण नसल्याने हा सर्व प्रकार सुरू आहे. रहायचेच किती दिवस, असे म्हणत कुणी तक्रारही करायला पुढे येत नाही.

अधिकाºयांना अ‍ॅलर्जी
भंडारा शहरातील विविध विभागाचा प्रमुख अधिकाऱ्यांना फोनची अ‍ॅलर्जी दिसते. राजेदहेगाव केंद्राबाबतच्या तक्रारीसंदर्भात तहसीलदारांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही दिवस फोन उचलला नाही. एसएमएस करून माहिती विचारली तर त्यालाही प्रतिसाद नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचीही अशीच अवस्था आहे. एखाद्यावेळेस फोन उचलला तर साचेबद्ध उत्तर दिले जाते.

मी पुण्यावरून भंडाऱ्याला आलो. कोणाच्याही संपर्कात न येता कारनेच गावी पोहोचलो. होम क्वारंटाईन केले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु नंतर नवीन नियम कळला आणि शासकीय क्वारंटाईन सेंटरचा नाईलाजाने पर्याय निवडला. तेथील अवस्था पाहून आरोग्य धोक्यात येईल काय, अशी शंका येवू लागली. अधिकाºयांकडून केवळ टोलवाटोलवीचे उत्तर मिळाले.
-पंकज इंगोले.

Web Title: Quarantine centers only worsen health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.