शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच कार्डधारकांना नि:शुल्क राशन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६८८ कार्डधारकांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. या कार्डधारकांना सरकारकडून मिळणाºया राशनास कोणतीही अडचण येत नाही. मात्र अद्यापही ऑनलाईन नोंदणी न झालेले ४३ हजार ६८८ शिधापत्रिकाधारक आजही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे.

ठळक मुद्देनरेंद्र भोंडेकर : अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी न झालेल्या कार्डधारकांना अन्नधान्य मिळत नसल्याने शेकडो कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने ऑनलाईन, ऑफलाईन असा भेदभाव न करता सर्व शिधापत्रिकाधारकांना नि:शुल्क अन्नधान्याचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने उपस्थित होते.
जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६८८ कार्डधारकांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. या कार्डधारकांना सरकारकडून मिळणाऱ्या राशनास कोणतीही अडचण येत नाही. मात्र अद्यापही ऑनलाईन नोंदणी न झालेले ४३ हजार ६८८ शिधापत्रिकाधारक आजही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्वांना अन्नधान्याचा पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यासाठी परिश्रम घेत आहेत. मात्र गरीब, गरजु असणाºया परंतु ऑनलाईन नोंदणी न करू शकलेल्या कुटुंबियांसाठी शासनाने पुढाकार घेत सर्वांनाच नि:शुल्क अन्नधान्याचे वाटप करावे, असे निवेदनातून सांगितले आहे.
जिल्ह्यात नियम शिथिल करून अन्नधान्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांकडून सामान्य जनतेची पिळवणूक होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहनदेखील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी निवेदनातून केले आहे.