शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात प्रोजेक्ट ग्रीनचे दीड लक्ष रुपये मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:19 IST

अनेकांच्या हातभारातून ग्रीन प्रोजेक्ट उभा झाला. त्यावर सुमारे दीड लक्ष रुपये खर्च करण्यात आले. तथापि, या लाख रुपयांचा मातीत चुराडा झाला. सढळ हाताने सहकार्य करणाऱ्यांच्या भावनांशी खेळ झाला आहे.

ठळक मुद्देसंवेदनशील अधिकारी : वृक्ष जगवा संकल्पना तुडविली पायदळी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनेकांच्या हातभारातून ग्रीन प्रोजेक्ट उभा झाला. त्यावर सुमारे दीड लक्ष रुपये खर्च करण्यात आले. तथापि, या लाख रुपयांचा मातीत चुराडा झाला. सढळ हाताने सहकार्य करणाऱ्यांच्या भावनांशी खेळ झाला आहे. तसेच शासनाच्या वृक्ष लागवडीच्या संकल्पनेला प्रशासनिक अधिकाऱ्यांना कशी मुठमाती दिली, त्याचा पुरावा मोहाडी तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या परिसरात दिसून येतो.समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना वास्तव्यात उतरविण्यासाठी शासन धडपड करीत आहे. १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र शासनाने यावर्षी उद्दिष्ट गाठले. नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड व संवर्धन कामाला मोठ्या संख्येने संगळ्याना हातभार लावल्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाचे चांगले फलित आले.वृक्ष लागवड लोकचळवळ झाली असे असतांना विपरीत दिशेने जाण्याचा मार्ग मोहाडी तहसील मधील प्रशासनाने स्वीकारला. दोन वर्षापूर्वी पडीक जागेत फळबाग व रोपवनाचा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमासाठी शासनाच्या एक रुपयाही खर्च झाला नव्हता. ओसाड व पडीक जागेला हिरव्या वनराईमध्ये रुपांतर करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील अनेक जनतेनी भरभरुन मदत केली होती.लोकसहभागातून दीड लक्ष रुपये संकलीत करण्यात आले होते. मनसर येथून उच्च प्रजातीचे फळरोप व इतर वृक्ष आणण्यात आले होते. या वृक्ष लागवडीचे संवर्धन करण्यासाठी मजूर व तहसील मधील चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाºयांनी कडक उन्हात घाम गाळून वृक्षांना पाणी दिले.पण, अधिकारी परत्वे मानसिकता बदलत असल्याचा प्रत्यय दोन वर्षांनी दिसायला लागला आहे. अनेकांच्या श्रमातून, त्यागातून, सहभागातून उभा झालेला ग्रीन प्रोजेक्ट उद्ध्वस्त झाला आहे.कठड्यात आता झाडाऐवजी गवत उभे झाले आहे. शासनामार्फत रोजगार हमी योजनेतून कृषी विभाग, सामाजिक वनीकरण व आता नंदनवन वृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. तापमानातील वाढ, हवामान व ऋतुबदलाची दाहकता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात आहे. मात्र मोहाडी तहसील मागील परिसरातील संबंधित झालेली वृक्ष पाण्याअभावी व देखरेखीअभावी पूर्णत: वाळून गेली आहेत.वृक्षतोड करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. परवानगी न घेता झाडे कापली गेली तर वनविषयक गुन्हा ठरतो. मग संवर्धीत झालेली, जगलेली मोहाडी तहसीलच्या प्रशासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे हिरवी झाडे करपली ़आहेत.झाडे मातीत गेली त्यामुळे तहसील कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर वनविभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करावी, अशी चर्चा तहसील परिसरात होतानी दिसून आली.

टॅग्स :forest departmentवनविभाग