शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: July 5, 2014 23:25 IST

तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली आहे. प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यात यावे,

२३ शिक्षकांचे वेतन द्या : खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली आहे. प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शनिवार रोजी प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. शिष्टमंडळाने खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन सोपविल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
पंचायत समिती भंडारा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन प्रलंबित होते. प्रलंबित वेतन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नाने दि. २२ जून २०१४ ला अदा करण्यात आले. परंतु शालार्थ वेतन प्रणालीचे कारण दाखवून निवडक २३ शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन अदा करण्यात आले नाही. खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षक संघाने अनेकदा चर्चा केली. सदर शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येत नसल्यामुळे शिक्षकांच्या पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली असून शिक्षकांची मानसिक स्थिती बिघडली आहे.
२३ शिक्षकांच्या प्रलंबित वेतन अदा न केल्यास प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा भंडाराच्या वतीने दि. ६ जुलैपासून पंचायत समितीचे कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात शिक्षक नेते दिलीप बावनकर, जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, तालुकाध्यक्ष दिलीप बागडे, सरचिटणीस प्रभू तिघरे, वामन ठवकर, रमेश मदारकर, नामदेव गभणे, अशोक भुरे, प्रमोद कळंबे, सुधीर वाघमारे, श्रावण हजारे, विरेद्र निंबार्ते यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)