जवाहरनगर : आएएस अधिकारी शेतकऱ्यांची, गरीबांची मुले होऊ शकतात. त्याकरिता फार कोचिंग क्लास लावण्याची गरज नाही. ज्यांना गरीबीची जाणीव आहे व देशसेवेची महत्वाकांक्षा ज्यांच्या मनात आहे त्या व्यक्तींनी दररोज केवळ ३० प्रश्नांची तयारी केली तरी पुरेसे आहे. पण त् याकरिता चिकाटी, सातत्य व मनाची भक्कम तयारी करणे अत् यंत अगत्याचे आहे. ठाम मनाने ठरविले पाहिजे की, मला आयएएस अधिकारी बनायचे आहे. हे वाक्य तना मनात भिनले पाहिजे. असे सूचक मार्गदर्शन आएएस मिशन अमरावतीचे संचालक डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी केले.तु.ब.शि. संस्था तुमसर द्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय पे.पंप ज.नगर येथे विद्यार्थी मार्गदर्शन समिती विभागाच्या वतीने २१ आॅगस्ट रोजी एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.डी.जी. टेंभरे, उद्घाटक व मुख्य वक्ते डॉ.नरेशचंद्र काठोळे हे होते. यावेळी गुणवंत काळबांधे, ज्ञानेश्वर बोळखे, डॉ.प्रा.आर.टी. पटले उपस्थित होते. अधिकारी बनून कुटुंबाची व देशाची सेवा करावी व महाविद्यालयाचे नाव रोशन करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन डॉ.डी.जी. टेंभरे यांनी केले.प्रास्ताविक व परिचय प्रा.जे.व्ही. कोटांगले व संचालन डॉ.नलीनी बोरकर, आभार डॉ.आर.टी. पटले यांनी मानले. प्रा.रहांगडाले, प्रा.बावनकर, प्रा.गणवीर, प्रा.साखरवाडे, प्रा.नाकाडे, प्रा.चौधरी, प्रा.वाघाडे, प्रा.रविदास, प्रा.डोहणे, प्रा.दियावार, प्रा.मानकर, प्रा.वंजारी, प्रा.रहांगडाले, प्रा.वंजारी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
अधिकारी बनण्यासाठी समृद्ध मनाची भक्कम तयारी करा
By admin | Updated: August 24, 2014 23:18 IST
आएएस अधिकारी शेतकऱ्यांची, गरीबांची मुले होऊ शकतात. त्याकरिता फार कोचिंग क्लास लावण्याची गरज नाही. ज्यांना गरीबीची जाणीव आहे व देशसेवेची महत्वाकांक्षा ज्यांच्या मनात आहे
अधिकारी बनण्यासाठी समृद्ध मनाची भक्कम तयारी करा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}