शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उपस्याअभावी तलाव बनले उथळ

By admin | Updated: May 4, 2017 00:29 IST

भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा असला तरी वर्षानुर्वे गाळ न उपसल्याने हे तलाव उथळ झाले आहेत.

उपाययोजना शुन्य : जलयुक्त शिवार योजनेतून जलस्तर वाढविण्याची गरजशिवशंकर बावनकुळे साकोलीभंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा असला तरी वर्षानुर्वे गाळ न उपसल्याने हे तलाव उथळ झाले आहेत. नदी नाल्याची खोलीही दिवसेंदिवस कमी होत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असून झळी स्वरूपाचा पाऊस पडत नाही. जंगलांचा ऱ्हास, जमिनीचे क्षरण व अन्य कारणामुळे तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भूर्गभजलाचा साठा कमी होऊन पातळी खोल जात आहे. तलावातील गाळ उपसा होत नसल्याने जिल्ह्यासह सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून शासनाने गावोगावी जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. परंतु साकोली-सेंदुरवाफा नगर परिषदेंतर्गत असणारे नदी नाले तलाव या योजनेत सध्यातरी समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे कधी नव्हे अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परिसरात शेतशिवारात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. साकोली नगरपरिषदने याबाबत उपाययोजना आखण्याची गरज आहे. या उन्हाळ्यात उपाययोजना केल्यास किमान पावसाळ्यात पाण्याचा जलस्तर वाढण्यास मदत होईल.सध्या वर्ष २०१६-१७ मध्ये तालुक्यात सहा गावात १२ तलावांमध्ये तर २०१७-१८ मध्ये सात गावांमध्ये १८ तलावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे सुरू आहेत हे येथे उल्लेखनीय आहे. वर्ष २०१७-१८ च्या योजनेत साकोली-सेंदुरवाफाचा समावेश नाही. परंतु गरज आता आहे, म्हणून विशेष प्रकरण म्हणून साकोली येथे जलयुक्त शिवाराची कामे प्राधान्याने घेण्याची गरज आहे.