शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हेल्पलाइन कक्ष पोलिसांसाठी ठरला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST

भंडारा : सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आपली तक्रार देता यावी यासाठी राज्य शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस ...

भंडारा : सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आपली तक्रार देता यावी यासाठी राज्य शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांना तक्रार करण्यासाठी पोलीस हेल्पलाइन कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी कार्यालयाच्या हेल्पलाइनवर तक्रार करतात. यात अनेक कर्मचारी आपले मेडिकल बिल, पदोन्नतीच्या तक्रारी, तसेच वेतननिश्चिती, किरकोळ रजा मिळण्यासाठी अशा विविध कारणास्तव तक्रारी करतात. यात जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी तत्काळ तक्रारींची दखल घेत अनेक तक्रारींचे निवारण केले आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात तसेच त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्निकांड प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध मंत्री दौऱ्यावर राहिले. यामुळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीच घेता आली नाही. त्यामुळे एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे कर्तव्य पार पाडताना पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ होते. जिल्हा अधीक्षक पोलीस कार्यालयात हेल्पलाइन कक्षात वर्षभरात ७८ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात सर्वाधिक २१ तक्रारी मिळाल्या. त्यानंतर फेब्रुवारी १२, मार्चमध्ये चार, एप्रिल महिन्यात पाच, मे महिन्यात तीन, जून १३, जुलै पाच, ऑगस्टमध्ये पाच, सप्टेंबर महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी तीन तक्रारी तर डिसेंबरअखेर चार तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या होत्या. यातील ७६ तक्रारींचे निवारण करण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. मात्र काही कारणास्तव वेतननिश्चितीची दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र असे असले तरी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करणारा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या बाबूंविषयी नाराजी असल्याचे दिसून येते. अनेकदा सेवानिवृत्तीनंतर आपली पेन्शन, फंड, आपली मेडिकल बिले लवकर मंजूर करताना अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना बाबूंकडून वेठीस धरल्याचीही माहिती आहे.

बॉक्स

७६ तक्रारींचे वर्षभरात निवारण

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये विविध पुरुष, महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. यामध्ये वर्षभरात शहरात वर्षभरात ७८ तक्रारींपैकी ७६ तक्रारी निकाली काढण्यामध्ये पोलीस विभागाला यश आले. त्यामुळे पोलीस हेल्पलाइन कक्ष कर्मचाऱ्यांसाठी आधार ठरत आहे. राज्यात इतर जिल्ह्याची तुलना करता भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्यात चांगले यश मिळवले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.

बॉक्स

त्या पोलीस कर्मचाऱ्याला अश्रू अनावर

पोलीस म्हटले, की अरेरावी, धडकी भरवणारा आवाज हा ठरलेला. मात्र त्या पोलिसालाही भावना असतात. याचा प्रत्यय आज अनुभवाला आला. एका पोलीस कर्मचाऱ्याने आपले अनुभव कथन करताना आयुष्यभर कधी कोणतेच व्यसन केले नाही, साधी सुपारी खाल्ली नाही. मात्र नियतीने काही वेगळेच लिहिले होते. एक दिवस दुचाकीवरून जात असताना वन्यप्राण्याने हल्ला केला. अन् काही कळायच्या आत बेशुद्ध पडलो. काहींनी तत्काळ विलंब न करता दवाखान्यात नेल्याने सुदैवाने वाचलो. मात्र यावेळी दवाखान्याचे लाखो रुपयांचे बिल माझ्या पोलीस सहकाऱ्यांनीच भरले. त्यानंतर कुटुंबीय आले. मात्र असे असले तरीही पोलीस विभागात पदावर काम करणाऱ्यांना पोलिसांच्या भावना कळत नसल्यामुळेच माझे मेडिकल बिल प्रलंबित होते, अशी भावना बोलून दाखवताना एका पोलिसाला अश्रू अनावर झाले.

बॉक्स

पोलीस शिस्तीला महत्त्व

आपल्यावर अन्याय होत आहे याची जाणीव झाली तरी पोलीस विभागाची शिस्त महत्त्वाची आहे. वरिष्ठांच्या नजरेत कुठेही आपण भरणार नाही, शिस्तीचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची अनेकजण काळजी घेतात. स्वतःचे एखादे काम प्रलंबित राहिले तरी हरकत नाही, मात्र पोलीस शिस्त महत्त्वाची असल्याचे अनेक जण सांगतात.