शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

By admin | Updated: February 26, 2015 00:24 IST

कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आल्यास त्याची तक्रार घ्यावी त्याला परत पाठवु नये, असे शासनाच्या गृहमंत्रालयाचे आदेश असतांनाही मोहाडी प ोलीस ठाण्यात तक्रार कर्त्याला परत...

मोहाडी : कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आल्यास त्याची तक्रार घ्यावी त्याला परत पाठवु नये, असे शासनाच्या गृहमंत्रालयाचे आदेश असतांनाही मोहाडी प ोलीस ठाण्यात तक्रार कर्त्याला परत पाठविण्याची प्रथा सुरु असल्याने शासनाच्या ‘त्या’ आदेशाची अवहेलना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी तसा आदेशच काढला होता. कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आला तर सर्वप्रथम त्याची तक्रार घ्यावी. तक्रार कोणत्या स्वरुपाची आहे हे ठरवुनच नंतर कारवाई करावी. तक्रार जर दुसऱ्या पोलीस ठाण्याशी संबंधित असेल तर तक्रार स्विकारून ती संबंधित ठाण्याकडे पाठवावी. मात्र, तक्रारकर्त्याला परत पाठवु नये असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र मोहाडी पोलीस ठाण्यातुन अनेक लोकांना तक्रार न घेताच परत पाठविले जात असल्याची अनेकांची तक्रार आहे.दिनांक २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता जहीमाबी सैय्यद (७८) ह्या घरगुती भांडणाची तक्रार देण्यासाठी नातवासोबत गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यास स्टेशन डायरी अंमलदार धांडे याने नकार दिला. ह्या बाबत स्थानिक एका पत्रकाराने धांडे यांना तक्रार न घेण्याचे कारण विचारले असता तो तक्रार घेण्यास तयार झाला. मात्र, लेखी तक्रारीच्या दुसऱ्या प्रतिवर (ओसी) स्वाक्षरी करण्यास त्याने नकार दिला तसेच एका तासानंतर बिट जमादार गिरीपुंजे यांना स्वाक्षरी मागा असे सांगीतले. पोलीसांच्या जनतेप्रती असहकार वृत्तीमुळेच जनतेत पोलीसांप्रती सहानुभुती लुप्त होत असुन जनताही पोलीसांना सहकार्य करण्यास सहजासहजी तयार होत नाही. आणि एखाद घटना घडल्यास पोलीसांवर रोष काढल्या जातो. याला जबाबदार पोलीसांची अशीच कार्यप्रणाली कारणीभुत असते. याकडे पोलीस विभागाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. (शहर प्रतिनिधी)मोहाडीची सुरक्षा रामभरोसेपोलीस ठाणे मोहाडी येथील ठाणेदार जोतीराम गुंजवटे हे मागील एक महिण्यापासुन रजेवर गेले आहेत. त्यांच्या ठिकाणी मधुकर गिते यांना पाठविण्यात आले होते. मात्र त्यांचीही बदली पवनी येथे करण्यात आली असल्याने ७० हजार नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी आता रामभरोसे आहे. एपीआय दर्जाचे एकच अधिकारी असलेले सुहास चौधरी यांच्याकडे संपुर्ण ६७ गावांची जबाबदारी आली आहे. वैनगंगेच्या बलीकडील व येथुन ४५ कि.मी. दुर असलेल्या जंगलव्याप्त करडी क्षेत्राकडे लक्ष देण्यासाठी एकाच अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे.