शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरीतून 78 जणांना विषबाधा, बालिकेचा मृत्यू; सर्वांची प्रकृती धाेक्याबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 06:57 IST

१९ जणांवर पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे (११, रा. भेंडाळा), असे मृत बालिकेचे नाव आहे. रविवारी भेंडाळा येथे आठवडी बाजार भरला हाेता. या बाजारात गावातील अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. (Bhandara)

भंडारा : आठवडी बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ७८ जणांना विषबाधा हाेऊन एका बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे मंगळवारी घडली. आराेग्य विभागाने गावात धाव घेऊन शिबिर लावले असून, सध्या सर्वांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये ४१ पुरुष, २२ महिला, सहा मुले आणि नऊ मुलींचा समावेश आहे. (Poisoning of 78 people from Panipuri, death of a girl) १९ जणांवर पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे (११, रा. भेंडाळा), असे मृत बालिकेचे नाव आहे. रविवारी भेंडाळा येथे आठवडी बाजार भरला हाेता. या बाजारात गावातील अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. रात्री काही जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास हाेऊ लागला. त्यामुळे त्यांनी खासगी डाॅक्टरांकडून उपचार घेतले. दुसऱ्या दिवशी साेमवारीही काही जणांनी हाच त्रास हाेत असल्याने आसगाव, पवनी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तोपर्यंत याबाबत कुणालाही माहिती नव्हती. मात्र, मंगळवारी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी या बालिकेचा भाेवळ येऊन अचानक मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, मंगळवारी अनेकांना मळमळ आणि उलटीचा त्रास हाेऊ लागला. आराेग्य यंत्रणेला याची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुखी, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके यांनी भेंडाळा गावाला भेट दिली. पाणीपुरीचे नमुने घेण्यात येणार आहेत. 

ज्ञानेश्वरीच्या मृत्यूनंतर खडबडून जागदाेन दिवसांपासून गावात मळमळ आणि उलटीचा त्रास हाेत असला तरी कुणी फारसे याकडे लक्ष दिले नाही. ज्ञानेश्वरीच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली. आराेग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली. ज्ञानेश्वरी पाचव्या वर्गात शिकत हाेती. साेमवारी तिने शाळेत जाऊन शिष्यवृत्तीचा अर्ज भरला हाेता. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर