शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
3
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
4
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
5
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
6
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
7
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
8
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
9
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
10
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
11
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
12
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
13
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
14
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
15
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
16
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
17
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
18
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
19
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
20
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
Daily Top 2Weekly Top 5

दोरीचा आधार घेत सरळ रेषेत धान रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

परंपरागत पध्दतीने बांध्यात थेट रोवणी केली जाते. त्यामुळे जवळजवळ भात्याच्या पऱ्ह्यांची रोवणी होत असल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम मिळतो. परंतु कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. दोरीच्या सहाय्याने सरळ रेषेत कमी कालावधीचे पऱ्हे रोवणी होत आहे. कृषी विभाग थेट बांध्यावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे.

ठळक मुद्देलागवडीत सुधारणा : चुलबंध खोऱ्यात रोवणीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : परंपरागत धान रोवणीला फाटा देत आता शेतकरी दोरीचा आधार घेत सरळ रेषेत धानाची रोवणी करीत आहे. नव्या तंत्रज्ञानाने होणाºया शेतीतून अधिक उत्पन्नाची हमी आहे. सध्या चुलबंद खोऱ्यात धान रोवणीला सुरुवात झाली आहे.
परंपरागत पध्दतीने बांध्यात थेट रोवणी केली जाते. त्यामुळे जवळजवळ भात्याच्या पऱ्ह्यांची रोवणी होत असल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम मिळतो. परंतु कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. दोरीच्या सहाय्याने सरळ रेषेत कमी कालावधीचे पऱ्हे रोवणी होत आहे. कृषी विभाग थेट बांध्यावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे.
पालांदूर येथील प्रगतशील शेतकरी टिकाराम भुसारी यांच्या शेतात केवळ १८ दिवसांच्या पऱ्ह्यांची रोवणी सुरु आहे. दोरीने एका रेषेत पूर्व पश्चिम दिशेचा आधार घेत नेऋत्य वाऱ्यांचा अभ्यास करीत रोवणी आटोपली आहे. २० बाय १५ सेमी दोन रोपाचे अंतर सुरक्षीत ठेवण्यात आले आहे. मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी सहायक वैशाली खंदाडे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कृषी विभागाच्यावतीने नवनविन तंत्रज्ञानाची माहिती यावेळी देण्यात आली. अभ्यासपूर्ण नियोजन करीत शेतकऱ्यांनी कशी लागवड करावी याबाबत मार्गदर्शन केले. कमी खर्चात व्यवस्थीत नियोजन केल्यास धानाची शेती फायद्याची ठरु शकते, असे यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी