शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हजाराे शेतकऱ्यांची पायपीट थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

तालुक्यातील शहापूर येथे आदर्श सुशिक्षित बेराेजगार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते ...

तालुक्यातील शहापूर येथे आदर्श सुशिक्षित बेराेजगार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कार्यक्रमासाठी खरबीचे उपसरपंच संजय आकरे, अनिल गायधने, भीमराव भुरे, शहापूरचे सरपंच माेरेश्वर गजभीये, दादा सेलाेकर, नरेश लांजेवार, यशवंत वंजारी, पेट्राेलपंप ठाणाच्या सुषमा पवार, तुळशीराम वाघमारे, चंद्रशेखर गिरडे, विनायक तुरस्कर, आदर्श सुशिक्षित बेराेजगार बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे पदाधिकारी शैलेश माेथरकर, गणेश माेथरकर, सुनील गिरीपुंजे, विक्की गिरीपुंजे, वाल्मीक माेथरकर, याेगेश निमकर, सुखमनी साकाेरे, शिवाजी गिरीपुंजे, रंजित गिरीपुंजे, शिवशंकर बाेरकर, यांच्यासह शहापूरचे ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते.

यावेळी भाेंडेकर यांनी गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांची असलेल्या मागणीची पूर्तता आज हाेत असल्याने खऱ्या अर्थाने समाधान हाेत असल्याचे सांगितले. आता धान विक्रीसाठी पायपीट करावी लागणार नाही, असेही सांगितले. उपसरपंच संजय आकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सदैव तत्पर असून प्रशासनाकडे धान खरेदी केंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्यातील अनुभव कथन केले. सुनील गिरिपुंजे यांनी यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याचे काैतुक केले. संस्थेचे पदाधिकारी शैलेश माेथरकर, गणेश माेथरकर यांनी शेतकऱ्यांची शासनाने उशिरा का हाेईना हाक ऐकल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपले धान विक्रीचे अनुभव कथन केले.

बाॅक्स

पेढे वाटून केला आनंद साजरा

भंडारा तालुक्यातील शहापूर, परसाेडी, ठाणा, खरबी, खराडी, चिखली परिसरातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी दूर अंतरावर जावे लागत हाेते. परिसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक व लूट हाेत हाेती. आता ही लूट थांबणार असून शहापूर येथे धान खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.