मुंबईहून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:47+5:30

आयसोलेशन वॉर्डमध्ये २० व्यक्ती भरती असून आतापर्यंत २७४ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग होस्टेल भंडारा क्वारंटाईनमध्ये १३ व्यक्ती भरती आहेत. तसेच साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये ३१९ व्यक्ती असे मिळून ३३२ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

A person from Mumbai is positive | मुंबईहून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह

मुंबईहून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाबाधीतांची संख्या झाली १४ वर : ७९१ जणांना कोवीड केयर सेंटरमधून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रविवारी चार रुग्ण कोरोनाबाधीत आढळल्यानंतर सोमवारी पुन्हा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर व्यक्ती ही मुंबईहून आली आहे. २३ मे रोजी त्या व्यक्तीच्या घश्याचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परिणामी जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या १४ झाली आहे.
आयसोलेशन वॉर्डमध्ये २० व्यक्ती भरती असून आतापर्यंत २७४ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग होस्टेल भंडारा क्वारंटाईनमध्ये १३ व्यक्ती भरती आहेत. तसेच साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये ३१९ व्यक्ती असे मिळून ३३२ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत या कोवीड केअर सेंटरमधून ७९१ जणांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८८ हजार ७३४ नागरिकांनी आरोग्य सेतू हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. फ्ल्यु ओपीडीअंतर्गत तीव्र श्वास दहाचे एकूण १४० व्यक्ती भरती असून १३९ व्यक्तींचे नमूने निगेटिव्ह आहेत.
गाव पातळीवर घरोघरी जाऊन आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत तिव्र श्वासदाह रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दरम्यान बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून तपासणी करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

१२ हजार १७५ व्यक्ती होम क्वारंटाईन
पुणे, मुंबई व इतर राज्यातून ३७ हजार ५८७ व्यक्ती आले असून २५ हजार ४१२ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच १२ हजार १७५ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून २८ दिवस घरामध्ये राहावे, बाहेर पडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. रविवारी ८८ व्यक्तींचे घश्यातील नमूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आतापर्यंत १३८० नमुन्यांपैकी १२३४ नमूने निगेटिव्ह तर १४ नमूने पॉझिटिव्ह आहे. १३२ अहवाल अप्राप्त आहे.

Web Title: A person from Mumbai is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.