शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग हाच जलयुक्त शिवारचा आत्मा

By admin | Updated: March 5, 2016 00:35 IST

जलयुक्त शिवार ही केवळ शासकीय योजना म्हणून याकडे पाहू नये. ही भविष्यकाळातील पाणी टंचाईवर मात करणासाठीची लोकचळवळ आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय कार्यशाळाभंडारा : जलयुक्त शिवार ही केवळ शासकीय योजना म्हणून याकडे पाहू नये. ही भविष्यकाळातील पाणी टंचाईवर मात करणासाठीची लोकचळवळ आहे. या योजनेत  लोकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असून यावर्षी निवड झालेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला पुढच्या पिढीसाठी पाण्याची तरतूद करुन ठेवण्याकरिता मिळालेली ही शेवटची संधी आहे, असे समजून यामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. अन्यथा आपली पुढची पिढ़ी आपल्याला माफ करणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ६९ गावांची निवड करण्यात आली. या गावात जलयुक्त योजनेचे योग्य नियोजन, अंमलबजावणी आणि लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पुणे येथील मनरेगा उपायुक्त बाळासाहेब शिंदे, अकोला येथील जल व मृद संधारण विभागाचे डॉ. एस.एम. टाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. भोर, पवनीच्या मुख्याधिकारी पवनीत कौर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आपल्या आधीच जलयुक्त शिवारचे उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी अनेक मामा तलावांच्या निर्मितीतून गावातील पाणी गावातच साठवले. तेव्हा कोणतीही सरकारी योजना नव्हती. हे आपले पाणी आहे हे समजून घेऊन त्यांनी पुढच्या पिढीसाठी काम केले. शेकडो वषार्पुर्वी करुन ठेवलेल्या या साठवण तलावांची क्षमता पुनर्जिवित करण्यासाठी मात्र आता लोकांचा सहभाग मिळत नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे.  आपण आता काम केले नाही तर जी परिस्थिती मराठवाड्याची आहे तशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.  भविष्यातील धोका समजून घेऊन गावातील लोकांनी योग्य नियोजना सोबतच प्रत्यक्ष लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बाळासाहेब शिंदे म्हणाले, शासनाला जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची गरज का पडली याची पार्श्वभूमी समजून सांगितली. जलयुक्तमध्ये पाणलोटच्या कामांना प्राधान्य देताना माथा ते पायथा या तत्वाप्रमाणे काम  करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अस्तित्वातील साठवण  संरचनाचे पुनर्जीवन व दुरुस्तीची कामे पहिल्यांदा हाती घेतली पाहिजे. त्याचबरोबर विहिरींचे पुनर्भरण, स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड आदी कामे घ्यावी, असे सांगितले. मृद व जलसंधारण विभागाचे डॉ.टाले यांनी शेतात पडणाऱ्या पाण्याचे नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. पूर्वीच्या दुष्काळात आणि आताच्या दुष्काळात खुप तफावत आहे. तेव्हा नदी नाल्यांमध्ये पाणी होते आणि अन्नधान्याची टंचाई होती. आता मात्र गावातील नदी, नाले, विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे या दुष्काळाची भीषणता अधिक आहे. यासाठी जागच्या जागी पाणी जिरवणे यावर भर दिला पाहिजे. शेतात कमी पाण्यात अधिक पिक घेणे, पिक पद्धतीत बदल करणे आजच्या काळाची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनासाठी शेततळे घेतले पाहिजे. यामुळे विहिरीचे पुनर्भरण आणि जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांनी केले. संचालन व आभार सोनवने यांनी केले. (नगर प्रतिनिधी)