जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०५ कोटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:01:05+5:30

भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे.

Payment of 105 crore of farmers in the district are tired | जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०५ कोटींचे चुकारे थकीत

जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०५ कोटींचे चुकारे थकीत

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा विसर । ३० लाख क्विंटल खरेदीत अद्याप बोनसची रक्कम नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निसर्गावर मात करीत शेतात पिकविलेला धान शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विकला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांचे १०५ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कोरोना संकटाने घोषीत लॉकडाऊनमध्ये शेतकरी अडचणीत आला असून आतापर्यंत जिल्ह्यात खरेदी झालेल्या ३० लाख क्विंटल धान खरेदी झाला आहे. ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपयांचे चुकारे आधारभूत किमतीने देण्यात आले. मात्र शेतकºयांना अद्यापही वाढीव बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.
भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे. तर १०५ कोटी ३५ लाख २७ हजार ७५ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. गत महिनाभरापासून कोरोना संसर्गाचे संकट घोंगावत आहे. संचारबंदी आणि लॉकआऊट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांना पैशाची गरज आहे. मात्रलॉकडाऊनमध्ये शासनाला शेतकऱ्यांचा विसर तर पडला नाही ना अशी शंका येत आहे.
सर्वसाधारण धान १८८५ रुपये आणि अ ग्रेडचा धान १८३५ रुपये प्रती क्विंटल दराने आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात आला. त्यानंतर शासनाने बोनस आणि वाढीव दर असा २५०० रुपये धानाचा भाव झाला. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ आधारभूत किमतीनेच चुकारे करण्यात आले. त्यामुळे वाढीव दराचे कोट्यवधी रुपये शासनाकडे बाकी आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना धानाची वाढीव दरासह रक्कम अदा करावी अशी मागणी आहे.

९८ हजार शेतकरी
जिल्ह्यात १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. ९० आधारभूत केंद्रावर धान खरेदी करण्यात आला. जिल्ह्यातील ९८ हजार १२८ शेतकऱ्यांनी आपला धान शासनाला विकला. त्यात भंडारा तालुक्यातील ५ हजार २९६ शेतकरी, मोहाडी १४ हजार ५३२ शेतकरी, तुमसर १६ हजार ९८५ शेतकरी, लाखनी १५ हजार ३९३ शेतकरी, साकोली १५ हजार १६३ शेतकरी, लाखांदूर २१ हजार २७१ शेतकरी, पवनी ९ हजार ३८८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व शेतकरी आता वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने तात्काळ या शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात मदत करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे धान खरेदीला ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना धान विकणे अडचणीचे जात आहे.

Web Title: Payment of 105 crore of farmers in the district are tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी