कैलास किसन देशमुख यांचे निलज येथे घर आहे. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यामुळे त्यांनी घरालगतच एका कौलारू घरात तात्पुरता आश्रय घेतला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाकानंतर त्यांची ...
दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. ...
आकाशात अचानक ढग जमा होऊन पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोंढा येथे दुपारी २ वाजता दरम्यान शनिवारला जोरदार पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतात पावसाचे पाणी साचले. यामुळे कापणी सुरु असलेले धान पीक प्रभावित झाले. कडपा पाण्याखाली आल्याने शेतकऱ् ...
शहरात घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रात्रच नव्हे, तर दिवसाही घरफोड्या झाल्या व होत आहेत, त्याही कडीकोंडा तोडून शहराबाहेरील वसाहतींत घरफोड्या अधिक प्रमाणात होत आहे. आता शहरातही दाट वस्तीत घरफोड्या झाल्या आहेत. कुठल्याही धातूचे कुलूप फोडून घरफ ...
१३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायती ...
जिल्ह्यातील निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांना खरेदीसाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे १५ दिवसांपूर्वी खरेदीसाठी असणारी लगबग यावर्षी मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. अनेक ठिकाणी इले ...
या संकल्पनेतून धानशेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणून मत्स्यशेतीचा प्रयोग कल्पना कापगते यांच्या शेतावर राबविण्यात आला. त्यांनी आत्मा व कृषी विभागाच्या मदतीने एक एकर शेतात हा मत्स्यव्यवसाय प्रकल्प राबविला आहे. यामध्ये शेतामध्ये चारही बाजूला दीड मीटर खोल ...
भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा श ...
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात २० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. भंडारात आठ, साकोलीत सात आणि तुमसरमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या अपक्षांनी प्रमुख दोन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्षांनी तीन व चार अंकी ...