जिल्ह्यात केवळ पाच हजार हेक्टरचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 06:00 AM2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:30+5:30

भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

Only five thousand hectares surveyed in the district | जिल्ह्यात केवळ पाच हजार हेक्टरचे सर्वेक्षण

जिल्ह्यात केवळ पाच हजार हेक्टरचे सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देउद्ध्वस्त धान : कृषी आणि महसूल विभागात समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आहेत. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात अतिशय संथगतीने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. आठवडाभरात केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्राचेच सर्वेक्षण झाल्याचे प्रशासन सांगत आहे. दुसरीकडे महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वेक्षणात समन्वय दिसत नाही. परिणामी सर्वेक्षणाला विलंब होवून शेतकºयांना मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर कृषी व महसूलचे कर्मचारी सर्व्हेक्षणाच्या कामाला लागले आहे. मात्र आजही अनेक शेताच्या बांधावर सर्व्हेक्षक पोहचत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईची अपेक्षा आहे. अनेक शेतकरी मदतीकडे आस लावून बसले आहे. परंतु संथगतीने होणाºया या सर्व्हेक्षणामुळे मदतीला दीर्घकाळ लागण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आठ हजार क्षेत्रापैकी आतापर्यंत पाच हजार हेक्टरच्या आसपास सर्व्हेक्षण झाल्याचे कृषी विभाग सांगत आहे. खरे पाहता जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु योग्य सर्व्हेक्षणाअभावी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.
महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांत समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर पोहचताच ते योग्य मुल्यांकन करून नुकसानीचे क्षेत्र ठरवित आहे. परंतु महसूल विभागाचे कर्मचारी पुढील तीन टप्प्यातील याद्यांचा त्रास वाचविण्याच्या नादात नुकसानीचा आकडा कमी दाखवत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या समन्वयातील अभावामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

५४२ अर्जांचे पंचनामे
कृषी विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १७९२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. विहित नमुन्यातील अर्जासोबत नुकसानीचे फोटोही अपलोड केले. विविध कागदपत्रांची जुडवा जुडव करून शेतकऱ्यांनी अर्ज तर सादर केले मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ ५४२ अर्जांचे पंचनामे करण्यात आले आहे. उर्वरित पंचनामे केव्हा केले जातील याबाबत कुणीही निश्चित सांगत नाही.

Web Title: Only five thousand hectares surveyed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.