बांधावरुनच सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:51+5:30

दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी शासनाला नुकसानीचा अहवाल पाठविला.

 Survey from the agriculture itself | बांधावरुनच सर्वेक्षण

बांधावरुनच सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देमदतीची आस : नुकसानीचा वस्तुनिष्ठ माहितीवर शेतकऱ्यांना शंका

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धानपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. मात्र महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी शेताच्या बांधावरुन नजर सर्वेक्षण करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नुकसानीच्या वस्तुनिष्ठ सर्वेक्षणाबद्दल शेतकऱ्यांमध्येच संशय व्यक्त होत आहे. सर्वेक्षणच योग्य झाले नाही तर मदत कशी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.
दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी शासनाला नुकसानीचा अहवाल पाठविला. त्या अहवालात जिल्ह्यात केवळ ८ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. खरे पाहता एकाच तालुक्यात यापेक्षा दुप्पट नुकसान झाले आहे. मात्र याबाबत प्रशासन काहीही बोलायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज सादर केले आहे. या अर्जाची सहानिशा केल्यास खरा आकडा कळू शकतो.
आता शासनाने आदेश दिल्यानंतर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी गावागावांत जावून सर्वेक्षण करीत असल्याचे चित्र आहे. मात्र अनेक गावांमध्ये आजही सर्वेक्षणासाठी पथक पोहोचले नसल्याची ओरड होत आहे. काही गावात केवळ एका ठिकाणी बसून सर्वेक्षण केले जात आहे. तर काही गावात शेतकऱ्यांच्या बाध्यापर्यंत पोहोचून केवळ नजरेने पाहणी केली जात आहे. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करतांना संबंधित गावातील सरपंच आणि पोलीस पाटलांसोबत शेतकऱ्यांच्या समक्ष सर्वेक्षण करण्याची गरज आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. केवळ शासकीय सोपस्कार पार पाडण्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कडप्याला येतोय सडका वास
परतीच्या पावसाने काढणी झालेला धान ओला झाला. हा कडपा आता सडत असून त्याला दुर्गंधी सुटली आहे. अनेक शेतकºयांनी ओला झालेला कडपा वाळविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. मात्र पावसाने मातीमोल झालेल कडपातून कोणत्याही उत्पनाची आशा नाही. झोपलेल्या धानाला अंकुर फुटत असून अनेक ठिकाणी धान काळा पडला आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

Web Title:  Survey from the agriculture itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती