शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धान केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची फरपट आता थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:33 IST

बेलगाव येथील उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बेलगाव येथील सरपंच रीना तुमसरे, ...

बेलगाव येथील उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बेलगाव येथील सरपंच रीना तुमसरे, उपसरपंच मनोज वडतकर, मांडवीचे सरपंच सयसराम कांबळे, पुष्कराज माटे, सचिन बोरकर, सुनील मोटघरे, प्रदीप देशमुख, मंगल केवट, श्रीधर डोरले, चत्रुधन केवट, रवि पडोळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापक रामकृष्ण गायधने यांनी शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्रावर उन्हाळी धान विक्री सन २०२० २१ साठी शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाइन करण्याची अंतिम मुदत ३१ मे असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाइन करावे, असे आवाहन केले. ऑनलाइनमध्ये शेतकऱ्यांना अडचणी आल्यास स्वतः बेलगाव येथील खरेदी केंद्राच्या कार्यालयात आणून द्यावे व आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही तिरुपती बहुउद्देशीय संस्थेचे व्यवस्थापक रामकृष्ण गायधने यांनी केले आहे. बेलगावच्या सरपंच रीना तुमसरे यांनी शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांच्या प्रलोभनांना बळी न पडता शेतकऱ्यांनी बेलगाव येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्राचे असलेले सहकार्य व शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात केलेली मदत लाख-मोलाची असल्याचे मांडवीचे सरपंच सयसराम कांबळे यांनी सांगितले. संचालन पुष्कराज माटे यांनी केले, तर आभार उपसरपंच मनोज वडतकर यांनी मानले. यावेळी मांडवी, खमारी, बेलगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

शेतकर्‍यांनो ३१ मेपूर्वी आपल्या नावाची नोंदणी करावी

भंडारा तालुक्यातील बेलगाव येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने दूर अंतरावर धान विक्रीसाठी होणारी कटकट कायमची थांबली असून, आमचे गाडी भाडे तसेच अन्य व्यापार्‍यांकडून होणारी लूट या समस्येतून सुटका झाल्याचे यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी सांगितले. संस्थेचे व्यवस्थापक रामकृष्ण गायधने यांनी शेतकऱ्यांना उन्हाळी धान विक्रीसाठी आपला सातबारा ऑनलाइन करण्याची अंतिम मुदत ३१ मे असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाइन करावे तसेच शेतकऱ्यांना ऑनलाइनमध्ये काही अडचणी आल्यास स्वतः बेलगाव येथील धान केंद्रात सातबारा आणून आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.