शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत रेती, गिट्टी, मुरुमाचे खुलेआम खनन

By admin | Updated: April 22, 2017 00:43 IST

तालुक्यात रेती, मुरुम व गिट्टीचे खुलेआम खनन सुरु असून शासनाला दररोज लाखों रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे.

महसूल विभागाचे दुर्लक्ष : रेती तस्करीसाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी संजय साठवणे  साकोली तालुक्यात रेती, मुरुम व गिट्टीचे खुलेआम खनन सुरु असून शासनाला दररोज लाखों रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. साकोलीचे तहसील प्रशासन या अवैध उत्खननाला रोखण्यासाठी सपेशल अयशस्वती ठरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी साकोली तालुक्यासाठी वेगळी ‘टिम’ तयार करून या अवैध उत्खननावर आळा बसवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. साकोली तालुक्यात चुलबंद नदीचे पात्र असून या नदीपात्रातून दररोज हजारो "ट्रीप" रेतीचे खुलेआम अवैध उत्खनन होत आहे. तालुक्याताील केवळ तीन रेतीघाटाचे लिलाव वगळता उर्वरीत रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. या रेतीघाटावरुन रात्री व दिवसा खुलेआम रेतीतस्करी राजरोसपणे सुरु आहे. महालगांव, लवारी, उमरी, धर्मापुरी, मोहघाटा, या रेतीघाटावरुन राजरोसपणे रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. रेतीतस्करी प्रमाणेच गिट्टी व मुरुमाचे अवैधरित्या खनन सुरु आहे. एकाच रॉयल्टीवर वेळ बदलवून तीन ते चार "ट्रीपा" केल्या जातात. तर या वैध उत्खननाचा महसूल विभागाची मूकसमंती असल्याचे दिसून येत आहे. रेती चोरीच्या दंडाला मुरूम चोरीचे दंड सध्या रेती तस्करांचे व तलाठ्याचे चांगलेच एकमत आहे. रेतीचे ट्रक पकडल्यास त्यांचेकडून १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करावा लागतो. मात्र तस्करी आपसी समजोता करुन रेतीऐवजी मुरुमाचे ५ हजार ४०० रुपये दंड करतात. तलाठी हे शासनाची दिशाभूल करतात. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची गरज साकोली तालुक्यातील बहुतांश तलाठी हे बाहेगावांहून ये-जा करतात. या तलाठयांचा ये-जा करण्याची वेळ रेती तस्करांना चांगल्याप्रकारे माहित असल्यामुळे नेमका या वेळेचा फायदा रेती तस्कर घेत आहेत. त्यामुळे त्या-त्या गावातील तलाठ्यांना मुख्यालयी सक्ती झाली तर रेती चोरीच्या घटनांवर आळा बसू शकेल, असे नागरिकांचे म्हणने आहे. उत्खनन झालेल्या घाटांची चौकशी करण्याची मागणी महालगांव, उमरी, लवारी, धर्मापुरी, मोहघाटा या रेती घाटतून किती ट्रक, ट्रॅक्टर रेतीची चोरी झाली याची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यांकडून तेवढ्या रेती चोरीची भरपाई वसुल करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.