तुमसर येथील मोकळे पटांगण, शेत शिवारात भरते मद्यपींची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:01:03+5:30

लॉकडाऊनने तुमसर शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार २० मेपर्यंत बंद होते. मात्र आता प्रशासनाने वाईन शॉपमधून आॅनलाइन दारू खरेदीला संमती दिली आहे. त्यामुळे मद्य शौकिनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज सायंकाळी बिअर बारमध्ये बसून पिण्याची सवय असलेल्या अनेक युवकांना आणि वृद्धांना आता बिअर बार बंद असल्यामुळे अडचण होत आहे.

Open ground and Shet Shivara at Tumsar a fair filled with alcoholics | तुमसर येथील मोकळे पटांगण, शेत शिवारात भरते मद्यपींची जत्रा

तुमसर येथील मोकळे पटांगण, शेत शिवारात भरते मद्यपींची जत्रा

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये शक्कल : मैदानात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लॉकडाऊनने शहरातील बिअरबार व वाईन शॉप बंद आहेत. मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यात व जिल्हाबाहेर वाईन शॉप सुरू असल्याने तालुक्यातील मद्यशौकीन तेथे जाऊन दारूची व्यवस्था जरी करीत असले तरी दारू पिण्याची व्यवस्था नसल्याने मद्य शौकिनानांनी शहरातील उघड्या मैदानात व जवळच्या शेत शिवारात मद्यपी एकत्रीत येऊन गर्दी करीत आहेत. त्याठिकाणी जणू जत्रेचे स्वरुप आल्याचे दिसून येते.
लॉकडाऊनने तुमसर शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार २० मेपर्यंत बंद होते. मात्र आता प्रशासनाने वाईन शॉपमधून आॅनलाइन दारू खरेदीला संमती दिली आहे. त्यामुळे मद्य शौकिनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज सायंकाळी बिअर बारमध्ये बसून पिण्याची सवय असलेल्या अनेक युवकांना आणि वृद्धांना आता बिअर बार बंद असल्यामुळे अडचण होत आहे. परिणामी मद्य शौकिनांनी नवीन शक्कल लढवून शहरातील मोकळ्या जागेवर किंवा जवळ असलेल्या शेतामध्ये बेकायदेशीर दारू खरेदी करून याठिकाणी निवांतपणे बसून उघड्या आकाशाखाली दारुचा आनंद घेत आहेत. परिसरात दारू बियरच्या रिकाम्या बाटलांचा खच पडलेला दिसून येतो. परिणामी शहरात शांतता व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या शहरात वाईन शॉप व बियरबार बंद असले तरी दारू शौकीन कोणत्याही पद्धतीने दारूची व्यवस्था करून आपला तलफ आजवर पूर्ण करीत आला आहे. मात्र आता तर आॅनलाइन दारू मिळणे सुरु झाले आहे. त्यामुळे हे मद्य शौकिन दारू मिळाल्यानंतर बसण्यासाठी ओसाड जागेचा अधिकाधिक वापर करणार आहेत. बंद पानटपऱ्या, शाळेचा आवार, कृषी उत्पत्र बाजार समितीसमोरील मोकळ्या जागेवर दररोज सायंकाळच्या सुमारास पाच ते सात लोकांचे गट वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले दिसतात. सायंकाळ होताच शौकीन फिरण्याच्या बहाण्याने या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू घेऊन बसलेले असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना येथून येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. मद्य शौकीन तिथेच दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकतात. प्रसंगी रस्त्यावर रिकाम्या काचेच्या बाटल्या फोडत असल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाºया महिला, आबाल वृद्धांना इजा होत आहे. यावर पोलीस प्रशासनाने वेळीच अंकुश लावण्याची गरज आहे.

Web Title: Open ground and Shet Shivara at Tumsar a fair filled with alcoholics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.