शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राष्ट्रीयीकृत बँकांनी केले केवळ तीन टक्के पीक कर्ज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेची आघाडी : कोरोना संकटातही गतवर्षीसारखी अवस्था

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. विविध बँकांमध्ये कर्जासाठी उंबरठे झिजवत आहेत. अशा संकटाच्या काळातही पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्याचे दिसत आहे. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच कर्जाचे वितरण या बँकांनी केले आहे. याउलट शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्ब्ल ७५ टक्के कर्ज वितरण करून यंदाही आघाडी घेतली आहे. वेळेवर पीक कर्ज मिळाले नाही, तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३९ हजार ४६७ शेतकऱ्यांना २०९ कोटींचे वितरण करण्यात आले. विदर्भ, कोकण बँकेला ३६ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १०३१ शेतकऱ्यांना ८० कोटी १ लाख म्हणजे २२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील खासगी बँकांना १९ कोटी ३८ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १२५ शेतकऱ्यांना एक कोटी ८७ लाखांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या १० टक्के कर्ज वितरण झाले आहे.दरवर्षी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरित करताना नकारघंटा देतात, असा अनुभव आहे. ऐनवेळेपर्यंतही कर्ज दिले जात नाही. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांना १२८ कोटी नऊ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ४८८ शेतकऱ्यांना ३६ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात २२ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. त्यापैकी ११ बँकांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, यापैकी केवळ बँका ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेने कर्ज वितरित केले आहे. इतर सात बँकांनी तर अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याला कर्जाचे वितरण केले नाही.  

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू आहे. पीक कर्ज वाटपाची उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले आहे. -अशोक कुंभलवार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी