शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यातील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची होणार चौकशी

By admin | Updated: October 2, 2015 05:35 IST

तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील घोळ झाल्याची दखल घेत राज्य शासनाने सन

लाखांदूर : तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील घोळ झाल्याची दखल घेत राज्य शासनाने सन २०१५ मधील महाराष्ट्रातील आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर येथील व्यवसाय व मार्गदर्शन विभागाचे सहसंचालक कार्यालयात हे आदेश धडकल्यामुळे आता बोगस प्रवेश प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.लाखांदूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०१५ ला आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. एक महिन्यापासून समितीने अहवाल सादर न केल्यामुळे विद्यार्थ्यांनी चौकशी समितीवर संशय घेतला आहे. व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेऊन रोजगार उभारावा अशी इच्छा बाळगून लाखांदूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडली. सन २०१५ ला पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध होताच कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र घोषित करून जास्त गुणधारक विद्यार्थ्यांना यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियातील अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतही घोळ झाल्याची बाब उघडकीस आली. यासंदर्भात सहसंचालक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली. पहिल्यांदाच व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतर संस्थेत मूळ कागदपत्रांची तपासणी करूनच संस्थेत प्रवेश निश्चित करण्यासाठी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची तपासणी दरम्यान मूळ कागदपत्रात तफावत आढळून आली. यात तब्बल ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बनावट कागदपत्राच्या आधारावर देण्यात आल्याचे दिसून आले.येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वेल्डर, फिटर, मोटर मेकॅनिक, ड्रेस मेकींग, टेलरिंग, कोपा अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. दि. ३ सप्टेंबरला सहसंचालकांनी चौकशी समिती गठीत करून संस्थेतील विद्यार्थ्यांचे कागदपत्र तपासण्यात आले. सदर प्रतिनिधीने प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सात दिवसानंतर अहवाल प्राप्त मिळणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु एक महिना लोटूनही अहवाल आला नाही. यासंदर्भात सदर प्रतिनिधीने सहायक संचालक सुरेश कुकडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, लवकरच अहवाल उपलब्ध केला जाणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा४सन २०१५ या सत्रात आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान येथील प्राध्यापकांनी घोळ करून कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश दिला. यात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या तीन प्राध्यापकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बनावट४या संस्थेत ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात असले तरी यातील १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्णत: बोगस तर १३ विद्यार्थ्यांना सदर संस्थेत प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही त्यांचे प्रवेश प्रक्रियेदरम्यान मूळ कागदपत्र कार्यालयातून गहाळ झाल्याची विश्वासनीय माहिती सूत्राने दिली. हे प्रकरण गंभीर असूनही सहसंचालकांनी दोषींविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही. माहिती देण्यास प्राचार्यांचा नकारविद्यार्थ्यांना बनावट प्रवेश दिल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. सहसंचालकाडून अहवाल येताच माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर आपल्याला माहिती देण्यात येईल.- अनिल कदम,प्राचार्य, आयटीआय लाखांदूर.