शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आता काही झाले तरी विलीनीकरणाशिवाय माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे वाहक प्रशांत लेंडारे व चालक विजय बांगर यांच्यासह उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा करून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे १ टक्के घरभाडे वाढ व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. या निर्णयावर एसटी कर्मचारी असंतुष्ट आहेत.

संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आता काही झाले तरी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार येथील एसटी कर्मचाऱ्यांनी केला असून, आपल्या आंदोलनावर ते ठाम आहेत. भंडारा आगारासमोर एसटी चालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कर्मचारी २ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसले आहेत. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे वाहक प्रशांत लेंडारे व चालक विजय बांगर यांच्यासह उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा करून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे १ टक्के घरभाडे वाढ व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. या निर्णयावर एसटी कर्मचारी असंतुष्ट आहेत. भंडारा आगारासमोर सुरू असलेल्या आंदोलनात वाहक प्रशांत लेंडारे, चालक विजय बांगर, अरविंद शहारे, देवचंद वासनिक, राधेशाम खडसे, अनिल मेंहर, राजकुमार वडेट्टीवार, लोकेश धोटे, संजय शिंदे, मधुकर कवासे, राजेंद्र कानतोडे, जितेंद्र हजारे, गोपाल खेताडे, इंद्रपाल तामगाडगे, महिला वाहक संध्या मेश्राम, सुचिता सलामे, मीनल शहारे, अस्मिता वासनिक, जयश्री बडवाईक, सुनंदा काटकर, घाटोळकर, जयश्री बडवाईक, वर्षा ठोंबरे, संतोष ठवकर, उमेश तिरपुडे, अश्विनी वाहने, जिजा पगाडे सहभागी झाले आहेत. 

अन् कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर- भंडारा आगारासमोर उपोषणासाठी बसलेले चालक व वाहक आपल्या व्यथा मांडत होते. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. अनेक चालक - वाहक आपल्या समस्या मांडताना अल्पवेतन, मुक्कामी बसेसवर होणारी गैरसोय, महामंडळाने आतापर्यंतचे करार वेळेत पूर्ण केले नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली. कर्मचाऱ्यांची एकजूट विजय मिळवून देणार असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :state transportएसटीagitationआंदोलन