शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२५२ अंगणवाड्यांमध्ये होणार नव्याने नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST

भंडारा : जिल्ह्यात उन्हाच्या झळा आता दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे ग्रामविकास ...

भंडारा : जिल्ह्यात उन्हाच्या झळा आता दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या नव्या आदेशाने जिल्ह्यातील १२५२ अंगणवाड्यांमध्ये नव्याने नद्या जोडणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे या अंगणवाड्या चालविल्या जातात. कोरोना संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाड्या बंद आहेत. सध्या अंगणवाड्यांमध्ये मुलांची हजेरी राहत नसली तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मात्र दररोज जावे लागत आहे. सध्या बालकांचे वजन मोजणे, आहार देणे, लसीकरण, मुलांचे आरोग्य तपासणी, घरबसल्या अभ्यास व पालकांना मार्गदर्शन अशा विविध कामांसाठी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीत जावेच लागत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ४९३ अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सोय होती. मात्र, आता नव्याने शासनाने शंभर दिवसांत अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्याचा आदेश दिला आहे. ग्रामविकास विभागाने अंगणवाडीला नळ कनेक्शन व स्वच्छतागृह देणे बंधनकारक केले आहे. यासाठी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागाने यात विशेष लक्ष घातले आहे. यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन जल जीवन मिशन मोहिमेअंतर्गत विविध कामांसाठी गती दिली आहे. यात जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वतःची इमारत आहे, तर काही ठिकाणी इतर इमारतींचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यातील भंडारा तालुक्‍यात २०१, मोहाडी तालुक्यात १७२, तुमसर तालुक्यात २२९, लाखनी तालुक्यात १५२, साकोली तालुक्यात १५१, पवनी तालुक्यात १९६, लाखांदूर १५१ अंगणवाड्यांमध्ये नव्याने नळजोडणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाडी मदतनीसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बॉक्स

अंगणवाडी मदतनीसांची पायपीट थांबणार

ग्रामविकास विभागाने प्रत्येक अंगणवाडीला नळ कनेक्शन व स्वच्छतागृह बंधनकारक केले असल्याने आता प्रत्येक अंगणवाडीला शंभर दिवसांत नळकनेक्शन मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी होणारी अंगणवाडी मदतनीसांची पायपीट आता थांबणार आहे. शिवाय स्वच्छता राखण्यासही मोठी मदत होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही नव्याने होणारी नळजोडणी ग्रामीण भागातील मुलांना दिलासा देणार आहे.