राज्यात कोरोना नियंत्रणासाठी अधिकाधिक चाचण्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:55+5:30

भंडारा जिल्ह्याची कोरोनासंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस भंडारा येथे शुक्रवारी आले होते. त्यांनी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस आदी उपस्थित होते.

The need for more and more tests for corona control in the state | राज्यात कोरोना नियंत्रणासाठी अधिकाधिक चाचण्यांची गरज

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी अधिकाधिक चाचण्यांची गरज

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : भंडारा येथील कोविड सेंटरला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
भंडारा जिल्ह्याची कोरोनासंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस भंडारा येथे शुक्रवारी आले होते. त्यांनी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे आणि वैद्यकीय चमू उपस्थित होती. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग दर सहा टक्के असल्याचे सांगण्यात आले. भंडारा येथील रुग्णालयात तीन तालुक्यातील रुग्ण आणले जातात. त्यामुळे खाटांची टंचाई निर्माण होते. त्याची लवकरच व्यवस्था करण्यात येईल, असेही यावेळी प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा महामंत्री हेमंत देशमुख, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार रामचंद्र वाघमारे, चरण वाघमारे यांच्यासह नितीन कडव, हेमंत बांडेबुचे, विजय गाढवे, प्रशांत खोब्रागडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The need for more and more tests for corona control in the state