नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याचा साकोली व भंडारात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:19+5:302021-02-06T05:07:19+5:30

साकोली येथे काँग्रेस कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, ...

Nana Patole became the Congress state president in Sakoli and Bhandara | नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याचा साकोली व भंडारात जल्लोष

नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याचा साकोली व भंडारात जल्लोष

साकोली येथे काँग्रेस कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, शहराध्यक्ष अश्विन नशिने, ॲड. आनंद नंदागवळी, छाया पटले, मनोहर डोंगरे, दीपक रामटेके, श्याम शिवणकर, जितेंद्र नशिने, उमेश भुरे, दामोधर नेवारे, शंकर राऊत, सत्यवान हुकरे, प्रकाश करंजेकर, रमेश दरडे, उमेश कठाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर भंडारा येथे गांधी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आंदोत्सव साजरा केला. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री बोरकर, भंडारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, पवन वंजारी, प्रशांत देशकर, अनिक जमा पटेल, सोहेल अहमद, मंजुषा चव्हाण, मुकुंद साखरकर, सचिन फाले, सुरेश गोंन्नाडे, मेहमूद खान, शाहीन मून, चांद डोंगरे, आनंद चिंचखेडे, साहिल मेश्राम, अक्षय गोंदोळे उपस्थित होते.

Web Title: Nana Patole became the Congress state president in Sakoli and Bhandara