शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजना यादीत मृतांची नावे

By admin | Updated: May 4, 2017 00:27 IST

लाखनी तालुक्यातील दिघोरी (नान्होरी) ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योनजेच्या लाभासाठी यादी तयार केली.

भंडारा : लाखनी तालुक्यातील दिघोरी (नान्होरी) ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योनजेच्या लाभासाठी यादी तयार केली. मात्र, यात पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्रांची नावे समाविष्ट केली आहे. यासोबतच यादीत मृतकांची नावे असल्याचा आरोप दिघोरी ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतरही दोषींना अभय देण्यात येत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दिघोरी (नान्होरी) ग्रामपंचायतीने सन २०११ मध्ये सामाजिक, आर्थिक व जाती निहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. यात निकषानुसार २४६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यात ओबीसी ९९, अनुसूचित जातीचे ४५ तर अनुसूचित जमातीचे पाच असे १४९ लाभार्थ्यांना पात्र दाखवून उर्वरित ९७ लाभार्थ्यांना वगळण्यात आले. ही यादी २०१५ मध्ये प्रकाशित केली. या यादीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांची तयार करण्यात आलेल्या यादीत घोळ करण्यात आलेला आहे. ज्या गरजूंना घरांची आवश्यकता आहे, अशांना यातून वगळण्यात आलेले आहे. तर मृत व्यक्तींचे नावे लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करून ग्रामपंचायत प्रशासनाने कळस गाठला आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, खंडविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांना तक्रार केली आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत सचिव एच. पी. हुमने, सरपंच अरूण जांभूळकर यांनी हेराफेरी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामसभेतून लाभार्थी निवडीची प्रक्रिया पार पाडावी लागते. मात्र, सरपंच, उपसरपंच व सचिव यांनी मर्जीतील नागरिकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी शासकीय नियम बाजू सारले. ग्रामसभा न घेता व अन्य ग्रामपंचायत सदस्यांना यादी बाबत कल्पना न देता नवीन लाभार्थी यादी तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीतून केला आहे. १५ आॅगस्ट २०१६ च्या नियोजीत ग्रामसभेमध्ये उपस्थितांचा कोरम पूर्ण झाला असतानाही, प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय नोटीस बुकावर घेण्यात आला. परंतू घरकुल लाभार्थी यादी तयार करण्याविषयी चर्चा न करताच परस्पर ही यादी तयार करण्यात आली. ही बाब २० फेब्रुवारीला ग्रामस्थांच्या लक्षात आली. याबाबतीत २८ फेब्रुवारीला लाखनी येथील खासदार नाना पटोले यांच्या जनता दरबारात याविषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान याप्रकरणाची चौकशी पंचायत समिती लाखनीचे शाखा अभियंता धनंजय बागडे व विस्तार अधिकारी नागलवाडे यांनी केली. यात पात्र लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याची नोंद करण्यात आली असून तसा अहवाल पंचायत समितीला पाठविला असल्याचे समजते. चौकशीनंतरही दोषी सचिव, सरपंच यांच्यासह अन्य व्यक्तींवर कार्यवाही होणे गरजेचे असताना त्यांची पाठराखण करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. १५ दिवसात दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)मृत व गाव सोडणाऱ्यांचा समावेशदिघोरी ग्रामपंचायतीने तयार केलेली यादी ही दिशाभूल करणारी आहे. या यादीत गावातील गौराबाई जांभूळकर, यादो खोब्रागडे व हरिश्चंद्र बडोले या मृतकांचे नाव आहे. तर टेकराम जांभूळकर हे मागील १० ते १५ वर्षांपासून गावात राहत नसतानाही त्यांचेही नाव यादीत समाविष्ठ करण्यात आलेले आहे. बालक खोब्रागडे यांना यापूर्वी घरकुलचा लाभ मिळालेला आहे. सध्या त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य असतानाही त्यांचे नाव आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ठ करण्यात आलेले आहे. या ग्रामस्थांना यादीतून वगळलेदिघोरी येथील अनेक ग्रामस्थांची घरे आजही मातीची व पडकी घरे आहेत. अशा ग्रामस्थांची घरे पक्के असल्याची खोटी नोंद करून त्यांना यादीतून वगळले आहे. यासोबतच अनेक कुटुंबांना स्वत:ची घरे नसतानाही त्यांना घर असल्याची नोंद करून योजनेपासून वंचित ठेवले आहे. अनेकांनी कुटुंबापासून वेगळा संसार थाटला असतानाही त्यांची संयुक्त कुटुंबात नोंद दाखविल्याने अशांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.लाभार्थी यादीबाबत पंचायत समिती या प्रकरणाचा उलगडा करेल. चौकशीला सामोरे जावू.- एच. पी. हुमणेग्रामसेवक, दिघोरी (नान्होरी).