महामार्गावरील चुरीने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:23+5:30

धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नवीन खड्ड्यांची भर पडत आहे. मात्र खड्डे बुजविणे, उखडणे पुन्हा बुजविणे हेच सत्र किती वर्ष चालणार, रस्ता रुंदीकरण होणार की खासगी कंत्राटदाराचे दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राट काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

Motorists suffer from highway thefts | महामार्गावरील चुरीने वाहनधारक त्रस्त

महामार्गावरील चुरीने वाहनधारक त्रस्त

Next
ठळक मुद्देअपघाताला निमंत्रण : खड्डे बुजविण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय महार्गावर संततधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गावरील खरबी (नाका) ते मुजबी पर्यंत पावसामुळे रस्त्यावरील चुरी विखुरली असून रस्त्यावर खड्डे वाढल्याने अपघाताची भीती वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नवीन खड्ड्यांची भर पडत आहे. मात्र खड्डे बुजविणे, उखडणे पुन्हा बुजविणे हेच सत्र किती वर्ष चालणार, रस्ता रुंदीकरण होणार की खासगी कंत्राटदाराचे दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राट काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्डे दिसत नाही. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी ते भंडारा नाकापर्यंत मोठाले खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना वाहन चालविणे त्रासदायक झाले आहे. गत तीन दिवसापासून पाऊस पडल्याने ठिकठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. खड्डे बुजविणे आवश्यक झाले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी ठाणा, खरबी येथील मदनपाल गोस्वामी, लोकेश चव्हाण, बादल मेहर, विशु पिंपळशेंडे, निखिल तिजारे, बाळू पडोळे यांनी एका निवेदनातून केली आहे.

संततधार पावसाचा परिणाम
गत तीन दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने नदीनाले ओसंडून वाहत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक ठिकाणी असलेली बंदी उठविल्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील चुरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साचल्याने दुचाकीधारकांना वाहन चालविणे कठीण होत आहे. त्यातच वाढलेल्या खड्यांमुळे अपघाताची भीती वाढली आहे.

Web Title: Motorists suffer from highway thefts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.